शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नईम कासीम झाला हिज्बुल्लाला नवा 'चीफ'! नसरल्लाहच्या हत्येनंतर महिन्याभराने केली निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 16:00 IST

Naim Qassem becomes new Hezbollah Chief: नरसल्लाह संघटनेचा चीफ असताना नईम कासीम त्याचा साथीदार म्हणून काम करत होता

Hezbollah Chief Naim Qassem: लेबनानची दहशतवादी संघटना हिजबुल्लाने जुन्या म्होरक्याच्या हत्येनंतर अखेर नवा प्रमुख निवडला. नईम कासीम हा हिज्बुल्लाचा नवा 'चीफ' असणार आहे. हसन नसरल्लाहच्या हत्येनंतर जवळपास एक महिन्यानंतर हिजबुल्लाने आपला नवा नेता निवडला आहे. गेल्या महिन्यात इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हसन नसरल्लाह मारला गेला होता. हिजबुल्लाने एक निवेदन जारी करून माहिती दिली की, नईम कासिम हसन नसराल्लाहची जागा घेणार आहे. कासीम बराच काळ नसरल्लाहचा साथीदार म्हणून काम करत होता. त्याच्या मृत्यूनंतर तो हिजबुल्लाचा कार्यवाहक प्रमुख म्हणून काम करत होता.

तीन दशकांनंतर बदलला 'चीफ'

हसन नसरल्लाह यांनी जवळपास तीन दशके या संघटनेचे नेतृत्व केले. नसराल्लाहच्या नेतृत्वाखाली हिजबुल्लाहने लेबनानमध्ये आपली संघटना मजबूत केली. आता हिजबुल्लाच्या निर्णय घेणाऱ्या शूरा कौन्सिलने दीर्घ विचारविनिमयानंतर नईम कासीमची नवीन नेता म्हणून निवड केली. विजय मिळेपर्यंत ते नसराल्लाहच्या धोरणांवर काम करत राहतील आणि अल-अक्सा आणि पॅलेस्टाइन जनतेला एकटे सोडणार नाहीत, असे हिजबुल्लाहने स्पष्ट केले. नसराल्लाहच्या हत्येला लेबनॉनमधील शिया समुदायामध्ये मोठा धक्का म्हणून पाहिले जात होते. कारण इस्रायलने नसराल्लाहच्या हत्येपूर्वी या संघटनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची हत्या केली होती. अशा परिस्थितीत नईम कासीम इस्रायलच्या हल्ल्यांना तोंड देण्यासोबतच आपल्या सैनिकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे.

लेबनानमध्ये इस्रायली सैनिकांचा खात्मा

आपल्या संघटनेच्या नेत्यांच्या हत्येनंतर, हिजबुल्ला देशात इस्रायली घुसखोरीशी लढा देत आहे. दररोज इस्रायली वस्त्यांवर रॉकेट आणि ड्रोन हल्ले करत आहे. वृत्तानुसार, गेल्या ३ दिवसांत हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यातील लढाईत 48 IDF सैनिकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, इस्रायलनेही लेबनानवर हवाई हल्ले सुरूच ठेवले असून त्यामुळे १० लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत आणि २ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धPalestineपॅलेस्टाइन