शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आफ्रिकेतील या देशात पसरला रहस्यमय आजार, रक्ताच्या उलट्या होऊन १५ जणांचा मृत्यू, ५० जणांना संसर्ग

By बाळकृष्ण परब | Updated: February 9, 2021 11:39 IST

Tanzania Mystery Disease: एकीकडे जगभरात कोरोनाचा फैलाव सुरू असतानाच आफ्रिकेमधील टंझानियामध्ये एक रहस्यमय आजार पसरला आहे.

ठळक मुद्देटंझानियामध्ये पसरलेल्या या रहस्यमय आजारामुळे बाधित झालेल्यांना रक्ताच्या उलट्या होत आहेतआतापर्यंत या आजारामुळे १५ जणांचा मृत्यू झाला आहेआतापर्यंत या आजारामुळे ५० जण बाधित झाल्याचे सांगण्यात येत आहे

दार ए सलाम - एकीकडे जगभरात कोरोनाचा फैलाव सुरू असतानाच आफ्रिकेमधील टंझानियामध्ये एक रहस्यमय आजार पसरला आहे. या अज्ञात आजारामुळे बाधित झालेल्या लोकांना रक्ताच्या उलट्या होत आहेत. यादरम्यान, टंझानिया सरकारने रहस्यमय आजाराची माहिती जाहीर करणाऱ्या चुन्या जिल्ह्याच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी फेलिस्ता किसांदू यांना निलंबित केले आहे.टंझानियामध्ये पसरलेल्या या रहस्यमय आजारामुळे बाधित झालेल्यांना रक्ताच्या उलट्या होत आहेत. आतापर्यंत या आजारामुळे १५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या आजारामुळे ५० जण बाधित झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, किसांदू यांनी सांगितले की, पाऱ्याच्या संसर्गाचा तपास करण्यासाठी रक्ताच्या नमुन्यांचा तपास करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत.मात्र टंझानियाच्या आरोग्य मंत्रालयाने कुठल्याही प्रकारच्या संसर्गाचे संकेत दिसत नसल्याचे म्हटले आहे. तसेच अनावश्यकरीत्या भीती पसरवल्याप्रकरणी किसांदू यांना निलंबित करण्यात आल्याचे सांगितले. किसांदू यांनी एका वृत्त संस्थेला सांगितले होते की, बहुतांश पुरुष रुग्णांमध्ये पोट आणि अल्सरचा त्रास जाणवला. आणि त्यांना सिगारेट तसेच हार्ड ड्रिंकचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात आला होता.त्यांनी सांगितले होते की, वरिष्ठ सरकारी केमिस्ट रक्त आणि पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करणार आहेत. जेणेकरून पाऱ्यामुळे झालेल्या प्रदूषणाची माहिती घेता येईल. दरम्यान, या रहस्यमय आजारामुळे झालेले मृत्यू हे इफूम्बोच्या एका वॉर्डमध्ये झाले आहेत. या वॉर्डमध्ये भरती करण्यात आलेल्या रुग्णांना रक्ताची उलटी झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मात्र टंझानियाचे आरोग्यमंत्री डोरोथी ग्वाजिमा यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच किसांदू यांना लोकांमध्ये भीती निर्माण केल्या प्रकरणी १० दिवसांसाठी निलंबित करण्याचा सल्ला दिला आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य