शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशात गेलेल्या रोहिंग्यांच्या परतीच्या वाटेत म्यानमारचे भूसुरुंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 09:34 IST

रोहिंग्यांना माघारी येता येऊ नये यासाठी म्यानमार सीमेजवळील प्रदेशात भूसुरुंग पेरत असल्याचा आरोप बांगलादेशने केला आहे. राँ

ढाका, दि. ७- बांगलादेशात पळून गेलेल्या व नो मँन्स लँडमध्ये आश्रय घेणा-या रोहिंग्यांना माघारी येता येऊ नये यासाठी म्यानमार सीमेजवळील प्रदेशात भूसुरुंग पेरत असल्याचा आरोप बांगलादेशने केला आहे. राँयटर्सला दिलेल्या माहितीत ढाकास्थित सूत्रांनी माहिती दिली आहे, तर राखिन प्रांताच्या मंत्र्यांनी भूसुरुंग पेरण्यासारखी कृत्ये आम्ही करत नाही असे सांगत हा आरोप फेटाळला आहे. 

बांगलादेश व म्यानमारच्यामध्ये असणा-या तारेच्या कुंपणाला समांतर भूसुरुंग पेरण्याचे काम काही गट करत असल्याचे व त्याचे पुरावे व छायाचित्रे असल्याची माहिती बांगलादेशातील सूत्रांनी दिली आहे. तसेच बांगलादेशच्या सीमा सुरक्षा दलांनी सोमवारी व मंगळवारी म्यानमारच्या दिशेने प्रत्येकी दोन भूसुरुंगाच्या स्फोटांचे आवाज ऐकल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सीमा ओलांडताना झालेल्या स्फोटात एका मुलाने आपला पाय गमावला आहे तर एका मुलास किरकोळ इजा झाल्या आहेत, या मुलांना बांगलादेशात उपचारास आणले गेले असता हा स्फोट भूसुरुंगाचा असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. 

एका रोहिंग्याने स्फोटाच्या स्थळी जाऊन केलेल्या चित्रिकरणात दहा सेंमी व्यासाची धातूची चकती दिसून आली, त्यावरुनही म्यानमार सीमावर्ती प्रदेशात भूसुरुंग पेरत असल्याचे स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

सुरक्षा परिषदेने तात्काळ हस्तक्षेप करावाम्यानमारमध्ये रोहिंग्यांची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत वाईट होत चालली असून संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा अशी विनंती ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि नोबेलविजेते महंमद युनुस यांनी केली आहे. अराकान प्रांतातील मानवी संकट आणि मानवतेविरोधात सुरु असलेल्या गुन्ह्यांना थांबवण्यासाठी तुमच्या हस्तक्षेपाची गरज असल्याचे सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या खुल्या पत्रात युनूस यांनी लिहिले आहे. बलात्कार, हत्या,  संपुर्ण खेडी जाळली जाणं यामुळं लोकांना घरदार सोडून परागंदा व्हावं लागत असल्याकडे युनूस यांनी या पत्रात लक्ष वेधले आहे.