शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

 म्यानमारने आपल्या नागरिकांना स्वीकारलेच पाहिजे- सुषमा स्वराज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 08:18 IST

गेले तीन महिने रोहिंग्यांचे स्थलांतर, राखिन प्रांतातील अशांतता यावर कोणताच तोडगा अद्याप निघालेला नाही. भारतात घुसलेल्या रोहिंग्यांना परत पाठवले जाईल अशी भूमिका घेणा-या भारत सरकारने अद्याप या भूमिकेत कोणताही बदल केलेला नाही.

ढाका- गेले तीन महिने रोहिंग्यांचे स्थलांतर, राखिन प्रांतातील अशांतता यावर कोणताच तोडगा अद्याप निघालेला नाही. भारतात घुसलेल्या रोहिंग्यांना परत पाठवले जाईल, अशी भूमिका घेणा-या भारत सरकारने अद्याप या भूमिकेत कोणताही बदल केलेला नाही. म्यानमारने आपल्या नागरिकांना ( म्हणजे रोहिंग्यांना) पुन्हा माघारी बोलवून त्यांचा स्वीकार केलाच पाहिजे, असे स्पष्ट मत भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले आहे. बांगलादेशच्या भेटीवर असताना स्वराज यांनी हे मत व्यक्त केल्याचे ढाका ट्रीब्यून या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहे. 

सुषमा स्वराज दोन दिवसांच्या बांगलादेश दौ-यावर  आहेत. या दौ-यात त्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. या बैठकीत स्वराज यांनी म्यानमारला आपले नागरिक माघारी घ्यावेच लागतील असे मत व्यक्त केल्याचे पंतप्रधान वाजेद यांचे प्रसिद्धी सचिव एहसानुल करिम यांनी सांगितले. या बैठकीतील चर्चेत सुषमा स्वराज म्हणाल्या " म्यानमारने आपले नागरिक माघारी बोलवावेत, .... हे बांगलादेशवर ( स्थलांतरितांचे) ओझे आहे. ते  बांगलादेश कितीकाळ सहन करु शकेल ? यावर कायमस्वरुपी तोडगा निघाला पाहिजे." तसेच स्वराज यांनी राखिन प्रांताच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने मदत करावी अशी इच्छा व्यक्त केली. बांगलादेशाने मानवाधिकारांचा विचार करुन राखिन प्रांतातून परागंदा व्हाव्या लागलेल्या लोकांना आधार व आश्रय दिल्याबद्दल त्यांनी बांगलादेशचे कौतुकही केले.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांनी बांगलादेश याबाबत म्यानमारशी सतत चर्चा करत असल्याचे सांगून बांगला गृहमंत्री लवकरच म्यानमारभेटीवर जाणार असल्याचे सांगितले. सुषमा स्वराज यांनी या बैठकीच्या वेळेस १९७१ च्या बांगलादेश मुक्तीसंग्रामासंदर्भातील काही भेटवस्तू शेख हसिना स्वराज यांना सादर केल्या. यामध्ये पाकिस्तानने पत्करलेल्या शरणागतीची रंगित प्रत, मूळ रेफ्युजी रिलिफ पोस्टल स्टॅम्पची रंगित प्रत तसेच युद्धावेळी बांगलादेशात विमानातून टाकलेल्या पाकिटांची रंगित प्रत भेट म्हणून देण्यात आली. सुषमा स्वराज आणि शेख हसिना वाजेद यांच्याबरोबर या बैठकीत बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री एएच महमूद अली, बांगलादेशच्या पंतप्रधानांचे परराष्ट्रविषयक सल्लागार डॉ. गौहर रिझवी, बांगलादेशचे भारतातील उच्चायुक्त सय्यद मुअझ्झिम अली, भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर, भारताचे बांगलादेशातील उच्चायुक्त हर्षवर्धन शृंगला उपस्थित होते. ढाका ट्रीब्यूनच्या माहितीनुसार सुषमा स्वराज यांनी आपल्या वक्तव्यात, राखिन प्रांताच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करुन तेथे लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. मात्र संपूर्ण चर्चेमध्ये स्वराज यांनी "रोहिंग्या" शब्द वापरण्याएेवजी म्यानमारचे विस्थापित नागरिक अशाच शब्दांचा वापर केला.

टॅग्स :Rohingyaरोहिंग्या