शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
3
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
4
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
5
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
6
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
7
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
8
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
9
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
10
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
11
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
12
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

रोहिंग्या प्रश्नाचे वार्तांकन करणाऱ्या दोन पत्रकारांना 7 वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 10:30 AM

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये या पत्रकारांना पकडण्यात आले होते. रखाईन प्रांतातील रोहिंग्यांचे हत्याकांड झाल्यावर या दोघांनी त्याचे वार्तांकन केले होते.

यांगोन- रोहिंग्यांच्या स्थितीबद्दल वार्तांकन करणाऱ्या रॉयटर्स समूहाच्या दोन पत्रकारांना 7 वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला आहे. कार्यालयीन गुप्तता कायद्याचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. आज यांगोन येथील न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली.वा लोन (32) आणि क्याव सोए ऊ  (28) अशी त्या दोघांची नावे आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये त्यांना पकडण्यात आले होते. रखाईन प्रांतातील रोहिंग्यांचे हत्याकांड झाल्यावर या दोघांनी त्याचे वार्तांकन केले होते. कारावासाची शिक्षा सुनावल्यावर क्याव याने आपण दोघेही निर्दोष असल्याचा पुनरुच्चार केला आणि या निर्णयाने धक्का बसला नाही असे सांगितले.

'' हा त्या दोघांसाठी, आमच्या संस्थेसाठी आणि सर्वच प्रसारमाध्यमांसाठी एक दुःखाचा दिवस आहे'',असे मत रॉयटर्सचे एडिटर इन चिफ स्टीफन अॅडलर यांनी व्यक्त केले. ह्युमन राइटस वॉचचे आशिया विभागाचे उपसंचालक फिल रॉबर्टसन यांनीही या निर्णयावर दुःख व्यक्त केले आणि म्यानमारच्या मुक्त अभिव्यक्तीवर हा आघात असल्याचे मत मांडले.या दोघांना ज्या कायद्यांतर्गत शिक्षा झाली आहे तो कायदा ब्रिटिशांनी वसाहतीच्या काळात तयार केला होता. यामध्ये जास्तीतजास्त 14 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. गेल्या सोमवारीच या दोघांच्या खटल्याचा निर्णय येणार होता मात्र न्यायाधीशांनी आपण आजारी असल्यामुळे न्यायालयात येऊ शकत नाही असे सांगून एक आठवडा निर्णय पुढे ढकलला होता.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून 7 लाख रोहिंग्यांनी म्यानमारच्या रखाईन प्रांतातून स्थलांतर केले आहे आणि त्यांनी बांगलदेशात प्रवेश केला आहे.  कुतापलाँग-बालुखाली या छावणीमध्ये 6 लाख 26 हजार लोक राहात असून जगातील सर्वात मोठी छावणी म्हणून ती ओळखली जात आहे. येथे अत्यंत कमी जागेत जास्त लोक सामावले असून प्रत्येक व्यक्तीला 10.7 चौ. मी इतकी जागा राहाण्यासाठी मिळत आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी किमा 45 चौ. मी जागा उपलब्ध असली पाहिजे. यातील 2 लाख रोहिंग्यांना पूर आणि दरडींचा त्रास सहन करावा लागू शकतो.

 

 

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याBangladeshबांगलादेशMyanmarम्यानमारMediaमाध्यमे