शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

म्यानमारमधील बंडखोरांनी भारतीय सीमेजवळचे शहर घेतले ताब्यात, भारतासाठी चिंता; सर्व लष्करी तळ ताब्यात घेतल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 07:29 IST

पलेटवा या शहरात भारताच्या मदतीने अनेक विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत. हे शहरच दहशतवाद्यांच्या ताब्यात गेले असेल, तर तेथील विकासप्रकल्पही धोक्यात येण्याची शक्यता आहे. 

यांगून : म्यानमारमधील तीन सशस्त्र गटांपैकी आराकान आर्मी या गटाच्या बंडखोरांनी भारतीय सीमेनजीक असलेले पलेटवा हे शहर ताब्यात घेतल्याचे जाहीर केले आहे. या शहरातील सर्व लष्करी तळ आम्ही ताब्यात घेतले आहेत, असेही एएने म्हटले आहे.

म्यानमारमधील चीन राज्यात पलेटवा हे शहर आहे. त्या देशातून भारत व बांगलादेशमध्ये येण्यासाठी जो मार्ग आहे, त्यातील महत्त्वाचे शहर दहशतवाद्यांच्या हाती लागणे ही भारतासाठीदेखील चिंतेची बाब आहे. एएने केलेल्या दाव्यावर म्यानमारच्या लष्कराने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पलेटवा या शहरात भारताच्या मदतीने अनेक विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत. हे शहरच दहशतवाद्यांच्या ताब्यात गेले असेल, तर तेथील विकासप्रकल्पही धोक्यात येण्याची शक्यता आहे. 

म्यानमारमध्ये वांशिक सशस्त्र गट असून, त्यांचा लष्कराशी संघर्ष सुरू आहे. त्यातील एए हा तुलनेने नवा गट असून, तो अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये लष्कराने सत्ता बळकावली. त्यावेळी एए गटाने म्यानमारमधील राखीन या भागावर ६० टक्के नियंत्रण मिळविल्याचा दावा केला होता. 

भारताने ४१६ सैनिकांना पाठविले होते परतसशस्त्र गटांशी सुरू असलेल्या संघर्षामुळे गेल्या काही महिन्यांत म्यानमारचे चारशेहून अधिक सैनिक पलायन करून भारताच्या हद्दीत आले होते. त्यातील काही सैनिक जखमी होते. त्यांना आसाम रायफल्सने काही दिवस भारतीय हद्दीत आश्रय दिला. त्यातील जखमी सैनिकांवर उपचार केले. आता या म्यानमारच्या सैनिकांना त्यांच्या देशात परत पाठविण्यात आले आहे. मात्र सशस्त्र गटांनी आता भारताच्या सीमेनजिकचे म्यानमारमधील शहर, काही गावे ताब्यात घेण्यात सुरूवात केली आहे. त्यामुळे म्यानमारबरोबरच भारतालाही चिंता वाटू लागली आहे.

टॅग्स :Myanmarम्यानमारIndiaभारत