शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

या देशात ६ वर्षीय मुलीला दहशतवादाच्या आरोपाखाली अटक, लष्करप्रमुखाच्या हत्येत सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 17:55 IST

या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत आहे.

म्यानमारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ६ वर्षीय मुलीला दहशतवादी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही मुलगी अलिकडेच एका निवृत्त लष्करी जनरलची हत्या करणाऱ्या संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप आहे. ही घटना म्यानमारची राजधानी यांगूनमध्ये दिवसाढवळ्या घडली. या मुलीला दहशतवादी असल्याचा आरोप असलेल्या १५ इतर लोकांसह ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी ६८ वर्षीय निवृत्त ब्रिगेडियर जनरल आणि माजी राजनयिक चो तुन आंग यांची यांगूनमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही हत्या भररस्त्यात दिवसाढवळ्या झाली. म्यानमारच्या लष्कर समर्थित वृत्तपत्र ग्लोबल न्यू लाईट ऑफ म्यानमारनुसार, या प्रकरणात एकूण १६ जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यात या मुलीचा समावेश आहे. ही मुलगी हत्येतील मुख्य आरोपीची मुलगी आहे.

या संघटनेने हत्येची जबाबदारी घेतली गोल्डन व्हॅली वॉरियर्स नावाच्या बंडखोर संघटनेने या हत्येची जबाबदारी घेतली आहे.  म्यानमार लष्कराने या गटाला दहशतवादी संघटना घोषित केले आहे.त्यांचा दावा आहे की, चो तुन आंग हे सतत लष्कराच्या दडपशाही कारवायांना, विशेषतः नागरिकांविरुद्ध, पाठिंबा देत होते. म्हणूनच त्यांना ठार मारण्यात आले.

म्यानमार सैन्याचा मोठा दावा या हत्येमागे देशाचे निर्वासित सरकार, राष्ट्रीय एकता सरकार (NUG) असल्याचा आरोपही लष्कराने केला आहे. मारेकऱ्याला सुमारे २००,००० क्याट (सुमारे ९५ अमेरिकन डॉलर्स) देण्यात आल्याचा दावा लष्कराने केला आहे. पण, NUG ने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. 

सत्तापालटानंतर कथा बदलली२०२१ च्या लष्करी सत्तापालटानंतर म्यानमारमधील परिस्थिती खूपच तणावपूर्ण बनली आहे. सार्वत्रिक निवडणुकांद्वारे निवडून आलेले सरकार काढून लष्कराने सत्ता काबीज केली. यानंतर, देशात गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. निषेध करणाऱ्या सामान्य नागरिकांना, महिलांना आणि मुलांनाही तुरुंगात टाकले जात आहे. AAPP या स्वतंत्र संस्थेच्या मते, आतापर्यंत ६०० हून अधिक मुलांना अटक करण्यात आली आहे, तर सुमारे ६,७०० नागरिक मारले गेले आहेत. 

टॅग्स :Myanmarम्यानमारCrime Newsगुन्हेगारी