शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

म्यानमार भूकंप: नमाज अदा करणाऱ्यांवर मशिदीचे छत कोसळले, शेकडो लोकांचा मृत्यू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 20:15 IST

शुक्रवारी म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेचा भीषण भूकंप आला, ज्यामुळे आतापर्यंत 1600+ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Myanmar Earthquake :म्यानमारमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे. या घटनेत आतापर्यंत 1600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 2000 हून अधिक जखमी झाले आहेत. याशिवाय, हजारो लोकांना बेघर व्हावे लागले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, रमजानच्या शेवटच्या शुक्रवारी शेकडो मुस्लिम नमाज अदा करत असताना अचानक मशिदी कोसळल्या. यात शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

मशिदींचे छत कोसळल्याने अनेकांचा मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार, म्यानमारमध्ये 28 मार्च रोजी झालेल्या 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा सर्वात जास्त परिणाम मंडाले आणि सागिंग भागात झाला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचे धक्के इतके वेगाने आले की, मशिदींची छत कोसळू लागली, ज्यात अनेक नमाजकांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक वृत्तानुसार या भूकंपात मंडाले आणि सागिंगमधील अनेक मशिदी उद्ध्वस्त झाल्या आहेत.

 मंडाले येथे सर्वात जास्त नुकसान झाले आहे, जेथे 50 हून अधिक मशिदी प्रभावित झाल्या आहेत आणि सुमारे 100 लोकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. मात्र, अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. बर्मा ह्युमन राइट्स नेटवर्कच्या मंग ला ना यांनी सांगितले की, सागिंगमध्ये मदतकार्यात गुंतलेले अनेक तरुणही या दुर्घटनेचे बळी ठरले. या घटनेनंतर अनेक देश म्यानमारच्या मदतीसाठी सरसावले आहेत.

 

टॅग्स :EarthquakeभूकंपMyanmarम्यानमारIndiaभारत