शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Myanmar : म्यानमारमध्ये रक्तरंजित शनिवार! लष्कराचा आंदोलकांवर बेछूट गोळीबार, तब्बल 144 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 15:36 IST

Myanmar 114 Civilians Killed : म्यानमारमध्ये शनिवार हा रक्तरंजित दिवस ठरला आहे. लष्कराने आंदोलकांवर बेछूट गोळीबार केला. यामध्ये 144 आंदोलकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता (Myanmar Army) हस्तगत केल्यानंतर परिस्थिती चिघळली आहे.  म्यानमारमध्ये शनिवार हा रक्तरंजित दिवस ठरला आहे. लष्कराने आंदोलकांवर बेछूट गोळीबार केला. यामध्ये 144 आंदोलकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या कित्येक आठवड्यांपासून हे आंदोलन सुरू आहे. बंडखोरीनंतर देशभरातील 44 शहरांत सर्वात मोठा रक्तपात करण्यात आला. म्यानमारमध्ये सुरू असलेल्या या रक्तरंजित खेळाने जगाला चिंतेत टाकले आहे.

म्यानमारमध्ये फेब्रुवारीमध्ये सत्ता उलथवण्यात आली होती. म्यानमारच्या लष्कराने देशावर ताबा घेतला होता तसेच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला बेदखल केले होते. आंग सान सू यांच्यासह मोठ्या नेत्यांना तुरुंगात डांबले आहे. यानंतर लोकांमध्ये सैन्याविरोधात उद्रेक पहायला मिळाला. लोक रस्त्यावर उतरले असून आंग सान सू यांना सोडण्याची मागणी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सैन्याने आक्रमक रुप घेत आंदोलन चिरडण्यासाठी आंदोलकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे.  

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि म्यानमारमधील यूएनच्या कार्यालयाने या हिंसाचाराविरोधात खेद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर विरोधात पोस्ट टाकल्यासदेखील कारवाई केली जात आहे. आतापर्यंत तिथे 2156 लोकांना अटक करण्यात आली आहे. ब्रिटिश सरकारने चिंता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांकडूनही म्यानमारच्या लष्कराने लोकांनी निवडून दिलेल्यांच्या हाती पुन्हा सत्ता सोपवावी असे आवाहन केले आहे. जगभरातील अनेक देशांनी म्यानमारमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा जोरदार निषेध केला आहे. 

म्यानमारमध्ये फेब्रुवारी 2021 ला सेनेकडून सत्तापालट करण्यात आल्यानंतर सतत विरोध प्रदर्शन केलं जात आहे. सेनेविरोधातील या प्रदर्शनांमध्ये महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. अशात विरोधाच्या एका खास पद्धतीची चर्चा होत आहे. मिलिट्रीला रोखण्यासाठी महिलांनी त्यांचे स्कर्ट्स उंच घरांवर लटकवले आहेत. रॉयटर्सनुसार, म्यानमारच्या महिला एक खासप्रकारचा स्कर्ट घालतात. ज्याला स्थानिक भाषेत सारोंग असं म्हणतात. म्यानमारमध्ये अशी मान्यता आहे की, जो पुरूष महिलेच्या या सारोंग खालून जातो त्याचं पौरूषत्व नष्ट होतं. हेच कारण आहे की, मिलिट्रीला रोखण्यासाठी महिला सारोंगचा वापर करत आहेत.

 

टॅग्स :Myanmarम्यानमारDeathमृत्यू