'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान सैरभर झाला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानमधील दहशतवादी तळे नष्ट झाली आणि त्यासोबतच पाकचे एअर बेस देखील नष्ट झाले आहेत. एअर बेसची अवस्था इतकी वाईट आहे की, त्यावरून कोणतीच उड्डाणे शक्य नाहीत. त्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, इतकं सगळं घडून गेल्यानंतर देखील पाकिस्तानचे सेना प्रमुख आसिम मुनीर जगभरात आपल्या कौतुकाचा ढोल वाजवताना दिसत आहेत. भारत-पाक संघर्षानंतर आसिम मुनीर यांनी दोन वेळा अमेरिकेचा दौरा केला. यावेळी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे देखील कौतुक केले.
सध्या ब्रुसेल्समध्ये असलेल्या आसिम मुनीर यांनी स्वतःला शांतीदूत म्हटलं आहे. इतकंच नाही तर, भारताविरोधात माझा मुलगा लढेल आणि जर तो शहीद झाला तर माझा नातू या लढ्यात सामील होईल. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी काश्मीर प्रश्नावर रडगाणं गायलं.
सध्या पाकिस्तानात सत्ताबदलाचे वारे वाहत आहेत. आसिम मुनीर देशात सत्तापालट घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, ब्रुसेल्समधल्या पाकिस्तानी नागरिकांशी बोलताना आसिम मुनीर म्हणाले की, मला नेता बनण्याचा अजिबात इच्छा नाही. मात्र, पाकिस्तानच्या लोकांना वाटत आहे की, देशात सत्तापालट झाल्यावर शहबाज शरीफ यांना खुर्चीवरून खाली खेचून मुनीर स्वतः तिथे बसतील.
ट्रम्प म्हणजे शांतीदूत!ब्रुसेल्स डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक करताना आसिम मुनीर यांनी त्यांना शांतता प्रिय आणि शांतीदूत म्हटलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यासाठी नामांकित केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेलसाठी नामांकित करण्याचं श्रेय पाकिस्तानलाच जात असल्याचं मुनीर म्हणाले.
काश्मीर मुद्द्यावर रडगाणं..
यावेळी आसिम मुनीर यांनी काश्मीर प्रश्नावर पुन्हा रडगाणं गायलं. ते म्हणाले की, "या जगात कोणताही कायदा नाही. जंगल राज सुरू आहे. जर तुमच्याकडे सत्ता असेल, तर जग तुमचा आदर करेल आणि तुम्हाला स्वीकारेल आणि ओळखेल. आम्ही शांततेवर विश्वास ठेवणारे लोक आहोत, परंतु जर कोणी आमच्याशी लढले तर आम्ही त्याला सोडणार नाही. काश्मीर ही भारताची मालमत्ता नाही, काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा नाही, तो एक आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे. माझा मुलगा भारताविरुद्ध लढेल आणि जर तो शहीद झाला तर माझा नातू लढेल."