शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांच्या’ आदेशावरून माझे अपहरण; पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा लष्करावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 06:52 IST

शनिवारी लाहोर येथील आपल्या निवासस्थानातून देशाला संबोधित करताना खान यांनी इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने (आयएसपीआर) त्यांच्यावर केलेल्या आरोपांना तीव्र आक्षेप घेतला.

लाहोर : न्यायालयाने सुटका केल्यानंतरच्या आपल्या पहिल्या भाषणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी लष्करावर हल्लाबोल केला. लष्करप्रमुखांच्या आदेशावरून माझे अपहरण करण्यात आले होते. त्यांना राजकारणात भाग घेतल्याची लाज वाटली पाहिजे. राजकारण करायचे असेल तर राजकीय पक्ष काढा ना, अशा शब्दांत इम्रान यांनी लष्कराची पिसे काढली.शनिवारी लाहोर येथील आपल्या निवासस्थानातून देशाला संबोधित करताना खान यांनी इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने (आयएसपीआर) त्यांच्यावर केलेल्या आरोपांना तीव्र आक्षेप घेतला. लष्कराच्या जनसंपर्क विभागाचा प्रवक्ता जेव्हा जन्मालाही आला नव्हता, तेव्हा मी जगात पाकचे प्रतिनिधित्व केले, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. “मी पाकचा झेंडा जगभर उंच ठेवला आहे. आयएसपीआरने असे विधान कधीच केलेले नाही. तुम्हाला स्वतःची लाज वाटायला हवी. तुम्ही राजकारणात उडी घेतली आहे. तुम्ही राजकीय पक्ष का स्थापन करत नाही”, असा भडीमार त्यांनी केला. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सर्व १४५ खटल्यांत दिलासा दिल्यानंतर खान यांनी एक तास देशाला संबोधित केले. 

तेव्हा तुमचा जन्मही झाला नव्हता...आयएसपीआरचे महासंचालक मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी इम्रान यांना “ढोंगी” म्हटले होते. त्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना इम्रान  म्हणाले, “माझे ऐका मिस्टर डीजी आयएसपीआर...मी जगात माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करून त्यातून देशाचे चांगले नाव करत असताना तुमचा जन्मही झाला नव्हता. मला ढोंगी व लष्करविरोधी म्हटल्याबद्दल तुम्हाला स्वतःची लाज वाटली पाहिजे,” असे इम्रान म्हणाले.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान