शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

स्टारबक्सनं मुस्लिम तरुणीच्या कपवर नावाऐवजी 'आयसिस' लिहिलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 16:37 IST

मुस्लिम तरुणीकडून संताप व्यक्त; स्टारबक्सविरोधात गुन्हा दाखल

मिनेसोटा: स्टारबक्सनं कॉफीच्या कपवर आयसिस लिहून दिल्याचा आरोप एका मुस्लिम तरुणीनं केला आहे. अमेरिकेतल्या मिनेसोटामधील स्टारबक्समध्ये हा प्रकार घडला. स्टारबक्समधील कर्मचाऱ्यानं कपवर आपलं नाव लिहिण्याऐवजी आयसिस लिहिल्याचा आरोप १९ वर्षीय तरुणीनं केला आहे. स्टारबक्सच्या कपवरील आयसिस हा शब्द पाहून भावना दुखावल्याचं आएशानं सांगितलं. आयसिस ही दहशतवादी संघटना असून ती इराक आणि सीरियामध्ये सक्रिय आहे. कपवर आयसिस लिहिण्यात आल्यानं आएशानं स्टारबक्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिनेसोटाच्या मानवाधिकार विभागानं हा गुन्हा नोंदवून घेतला आहे. भेदभाव करणारी वागणूक दिल्याचा आरोप आएशानं स्टारबक्सवर केला आहे. स्टारबक्सच्या कपवरील अक्षरं पाहून मला धक्काच बसला, असं आएशानं सांगितलं. तो शब्द वाचून मला अतिशय अपमानित झाल्यासारखं वाटलं, अशा शब्दांमध्ये आएशानं तिला झालेला त्रास बोलून दाखवला. 'त्या शब्दामुळे संपूर्ण जगात मुस्लिमांची प्रतिमा मलीन झाली आहे. आमच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही कृती स्वीकारार्ह नाही. मी ते सहन करू शकत नाही,' असं आएशानं म्हटलं.ही घटना १ जुलैला सेंट पॉल मिडवे येथील स्टारबक्समध्ये घडली. सध्याची परिस्थिती पाहता मी त्यावेळी फेस मास्क घातला होता, अशी माहिती आएशानं दिली. 'आएशा हे नाव अतिशय कॉमन आहे. त्यात चुकण्यासारखं काही नाही. त्यातही मी नाव काऊंटरवर अनेकदा स्पष्टपणे सांगितलं होतं. तरीही त्यांनी कपवर आयसिस कसं लिहिलं?, असा प्रश्न मला पडला', अशा शब्दांत आएशानं झालेला संपूर्ण प्रकार सांगितला. याप्रकरणी स्टारबक्समधील कर्मचारी महिलेनं स्वत:ची बाजू स्पष्ट केली. मी नाव नीट न ऐकल्यानं हा प्रकार घडला. त्यानंतर सुपरवायझरसोबत बोलून विषय मिटला होता. तिला (आएशाला) २५ डॉलरचं गिफ्ट कूपनदेखील देण्यात आलं होतं, असं स्टारबक्समधील कर्मचारी महिलेनं सांगितलं. 

टॅग्स :ISISइसिस