शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

मुशर्रफ यांची २३ पक्षांची आघाडी; ‘पाकिस्तान अवामी इत्तेहाद’ची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 05:05 IST

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि हुकूमशहा परवेज मुशर्रफ यांनी २३ राजकीय पक्षांची महाआघाडी स्थापन केली आहे. या महाआघाडीचे नाव ‘पाकिस्तान अवामी इत्तेहाद’ (पीएआय) असे असणार आहे. याच्या अध्यक्षपदी मुशर्रफ (७४) असतील तर, इकबाल डार यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि हुकूमशहा परवेज मुशर्रफ यांनी २३ राजकीय पक्षांची महाआघाडी स्थापन केली आहे. या महाआघाडीचे नाव ‘पाकिस्तान अवामी इत्तेहाद’ (पीएआय) असे असणार आहे. याच्या अध्यक्षपदी मुशर्रफ (७४) असतील तर, इकबाल डार यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, मुशर्रफ यांनी दुबईहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मीडियाला संबोधित करताना म्हटले की, मुहाजीर समुदायाचे प्रतिनिधित्व करणा-या सर्व पक्षांनी एकजूट होण्याची आवश्यकता आहे. त्यांनी मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) आणि पाक सरजमी पार्टी (पीएसपी) यांना या नव्या राजकीय आघाडीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. या आघाडीच्या स्वरूपाबाबत त्यांनी सांगितले की, सर्व सदस्य एकाच पक्षाच्या नावाने निवडणुका लढतील.मुशर्रफ हे एमक्यूएमचे नेतृत्व करत असल्याचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले. एखाद्या अल्पसंख्याक पक्षाचे नेतृत्व मी करणे हे हास्यास्पद असल्याचे सांगून ते म्हणाले की, एमक्यूएम-पाकिस्तानचे जे अस्तित्व मूळ स्वरूपात होते ते आता फक्त अर्ध्यावर आले आहे.पक्षाच्या अंतर्गत समस्येबाबत मी चिंतित आहे. जर हा पक्ष एकजूट राहत असेल तर, फारुक सत्तार अथवा मुस्तफा कमाल यांना बदलण्यात मला काही स्वारस्य नाही. एमक्यूएमवर टीका करताना ते म्हणाले की, पक्ष आणि मुहाजिर समुदाय आदर हरवून बसले आहेत.पाकिस्तान मुस्लीम लीग-कायदचे नेते चौधरी शुजात व चौधरी परवेज इलाही हेही महाआघाडीत सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर, पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफचे अध्यक्ष इम्रान खान यांनीही या आघाडीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. (वृत्तसंस्था)आरोपांचा सामना करूमुशर्रफ यांच्यावर गतवर्षी विशेष न्यायालयाने देशद्रोहाचा आरोप लावला होता. या वर्षी आॅगस्टमध्ये बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणात त्यांना फरार घोषित करण्यात आले होते. त्यांनी असा दावा केला की, सर्व आरोपांचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत. कारण, न्यायालये नवाज शरीफ यांच्या नियंत्रणात नाहीत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान