शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील लष्कराचे दहशतवादी देशभक्त, लष्करसोबत आघाडी करणार  - मुशर्रफ बगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 11:54 IST

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्ऱफ दहशतवादाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा बरळले आहेत. मुशर्रफ यांनी कट्टर दहशतवादी संघटना अल कायदाला पाठिंबा देण्याचे वक्तव्य केले आहे.

कराची - पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्ऱफ दहशतवादाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा बरळले आहेत. मुशर्रफ यांनी कट्टर दहशतवादी संघटना अल कायदाला पाठिंबा देण्याचे वक्तव्य केले आहे. तसेच भारतविरोधी कारवाया करून काश्मीरमध्ये दहशतवादी पाठवणाऱ्या लष्कर ए तोयबा आणि जमात उल दावा यांसारख्या दहशतवादी संघटनांबरोबर निवडणुकीसाठी युती करणार असल्याचे मुशर्रफ यांनी म्हटले आहे.  लष्कर आणि जमात उल दावा या दहशतवादी संघटना देशभक्त असल्याचा उल्लेखही मुशर्रफ यांनी केला आहे.  पाकिस्तामधील एआरवाय या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ यांनी लष्कर ए तोयबा आणि जमात उल दावा या संघटनांशी आघाडी करण्याचे संकेत दिले. " आतापर्यंत या दोन्ही संघटनांनी आघाडीसाठी माझ्याशी संपर्क साधलेला नाही. मात्र त्यांना माझ्यासोबत यायचे असल्यास माझी त्याला ना नसेल. मी उदारमतवादी आहे, पण त्याचा अर्थ मी धार्मिक कल असलेल्या लोकांच्या विरोधात आहे, असा होत नाही. मी लष्कर ए तोयबाचा समर्थक आहे. तसेच लष्कर ए तोयबा आणि जमात उल दावाचे लोकांना मी आवडतो, याचीही मला जाणीव आहे." याआधी लष्कर-ए-तोयबा आणि त्याचा संस्थापक हाफिज सईदचे आपण सर्वात मोठे समर्थक असल्याचे पाकिस्तानचे माजी हुकूमशाह परवेज मुशर्रफ (७४) यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. काश्मिरात भारतीय सैन्याकडून दडपशाही सुरू असून त्या विरोधात लढणाºया अतिरेकी संघटनांच्या भूमिकेचे आपण समर्थन करतो, असेही ते म्हणाले होते. सईद ज्या प्रकारे काश्मीरशी संलग्न आहे, त्याचे मी समर्थन करतो. अलीकडेच मुशर्रफ यांनी २३ पक्षांची आघाडी केली आहे. जम्मू-काश्मिरात भारतीय सैन्याची दडपशाही करत असल्याचा आरोप ते सातत्याने करीत आले आहेत.  ‘जमात-उद-दावा’ मला मान्य ते म्हणाले की, लष्कर-ए-तोयबा सर्वात मोठी ताकद आहे. सईदची दहशतवादी संघटना ‘जमात-उद-दावा’ मला मान्य आहे. तोयबावर पाकिस्तानात बंदी आहे आणि मुशर्रफ सरकारनेच हा निर्णय घेतला होता. याविषयी विचारता ते म्हणाले की, संघटनेवर बंदी आणली होती तेव्हाची ‘परिस्थिती’वेगळी होती.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद