शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंडला लपवतंय पाकिस्तान; झकीउर लखवीला ISI ने केले अंडरग्राऊंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 14:25 IST

दहशतवादी झकीउर रहमान लख्वी याला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने भूमिगत केले आहे.

Zakiur Rehman Lakhvi : मुंबई २६/११  हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहमान लख्वी याला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने भूमिगत केले आहे. गेल्या महिन्यात झकीउर रहमान लख्वीचा पाकिस्तानमध्ये फिरत असतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर आता झकीउर रहमान लखवीला भूमिगत करण्यात आलं आहे. लखवी हा अबू वासीच्या नावाने पाकिस्तानात फिरत असल्याचे समोर आलं होतं.

पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला लष्कर-ए-तोयबाचा कमांडर झकी-उर-रहमान लखवी याला भूमिगत होण्यास भाग पाडले आहे. त्याचा व्यायाम करताना व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक दाढी असलेला माणूस फिटनेस चॅलेंजमध्ये सहभागी असल्याचा दिसला. ही व्यक्ती जागतिक दहशतवादी असल्याचा अंदाज लावला जात होता. त्यानंतर तो झकीउर झकीउर रहमान लखवी असल्याचे म्हटलं जात आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, व्हिडीओमधील व्यक्ती खरोखर लख्वी होता. ज्याला २०२१ मध्ये पाकिस्तान कोर्टाने दहशतवादी कारवायांसाठी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून त्यांनी लखवीला भूमिगत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या अनेकांनी आपले सोशल मीडिया अकाउंट बंद केले आहेत. ३ मिनिटे ९ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये झकीउर रहमान लखवीपुश अप आणि डंबेल उचलताना दिसत होता.

झकीउर-रेहमान लखवी हा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि हँडलर आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात कोण असावे पण दहशतवाद्यांची मजा पाकिस्तानात नसेल तर जगात कुठे मजा येईल. त्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये का खेळत नाही, याचे उत्तर हे चित्र आहे कारण ज्या लाहोरमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने होणार आहेत, तिथे हा दहशतवादी व्हीव्हीआयपीप्रमाणे आपली तब्येत सांभाळत आहे.   

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानISIआयएसआय