शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

16 वर्षांच्या प्रियकराने बेडरूममध्येच केली प्रेयसीची डिलिव्हरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 14:13 IST

कॅथलीन मार्टिन आणि जॅक फुसिल यांची जून 2015 मध्ये ओळख झाली. नंतर दोघांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. कॅथलीनने आपल्या बेडरूममध्येच प्रियकर जॅकच्या मदतीने बाळाला जन्म दिला. 

(Image Credit: www.mirror.co.uk)

काउंटी डरहम : नॉर्थ ब्रिटेनच्या काउंटी डरहम शहरात फेसबुकवरून 31 वर्षीय महिलेचं आणि 16 वर्षांच्या मुलांचं प्रेम जुळलं. नंतर महिला आणि तरुणाने 7 महिन्यांच्या प्रेम संबंधानंतर बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाही तर या दोघांच्या बाळाची या तरूणाने घरीच डिलेव्हरी केली.

मिररने दिलेल्या वृत्तानुसार, कॅथलीन मार्टिन आणि जॅक फुसिल यांची जून 2015 मध्ये फेसबुकवरून ओळख झाली. नंतर दोघांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. कॅथलीनने आपल्या बेडरूममध्येच प्रियकर जॅकच्या मदतीने बाळाला जन्म दिला. 

कॅथलीनचं याआधी लग्न झालं होतं. या लग्नातून तिला 2 अपत्ये आहेत. असे असूनही वयाने तिच्यापेक्षा लहान असलेल्या तरूणासोबत नातं ठेवण्यात तिला काहीही समस्या नव्हती. कॅथरीनने सांगितलं की, सुरुवातीला आम्ही फेसबुकवर चॅटिंग करायचो. नंतर आम्ही भेटलो आणि आमचं अफेअर सुरु झालं. जेव्हा मी प्रेग्नंट होण्याचा विषय जॅककडे काढला तेव्हा त्याने यात मला साथ देण्याचा निर्णय घेतला. 

कॅथलीनने पुढे सांगितले की, 'जॅकने बाळाची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला. आमचं बाळ बेडरूममध्ये जन्माला आलं याच्या मागेही एक मजेदार किस्सा आहे. मला कळा येत असल्याने मी 5 वेळा हॉस्पिटलमध्ये गेले. पण प्रत्येकवेळी ड्यू डेट नसल्याकारणाने मला परत पाठवण्यात आलं. पाचव्यांदा हॉस्पिटलमधून परत आल्यावर मला पोटात वेदना होऊ लागल्या होत्या. जॅकने हॉस्पिटलला फोन केला आणि काही अनुचित घडू नये म्हणून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने त्याने माझी डिलेव्हरी केली'.

जॅक आणि कॅथलीन यांचं बाळ आता 9 महिन्यांचं झालं आहे. तर जॅकही आता 18 वर्षांचा झाला आहे. कॅथलीनला आधीच्या लग्नातून दोन मुलं आहेत. कॅथलीनचा मोठा मुलगा केवळ 5 वर्षांचा आहे. ती सांगते की, आमच्या परिवारात वय महत्वाचं नाहीये. आम्ही आनंदाला महत्व देतो. जॅकचं आणि माझ्या मुलांचं चांगलं बॉंडिंग आहे.

टॅग्स :Englandइंग्लंडInternationalआंतरराष्ट्रीय