शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 20:11 IST

रॅक्वेल स्मिथ या महिलेने आपल्या अवघ्या ६ वर्षांच्या मुलीला एका तांत्रिकाकडे काळ्या जादूसाठी विकल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आईसाठी आपलं मूल हे प्राणांहून प्रिय असतं. मात्र, दक्षिण आफ्रिकेतून समोर आलेली एक अत्यंत भयावह आणि धक्कादायक घटना संपूर्ण जगाच्या मन हेलावून टाकणारी ठरली आहे. केपटाऊन येथे राहणाऱ्या रॅक्वेल स्मिथ या महिलेने आपल्या अवघ्या ६ वर्षांच्या मुलीला एका तांत्रिकाकडे काळ्या जादूसाठी विकल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात तिचा प्रियकर जॅक्वान अपोलिस आणि मित्र स्टीव्हानो व्हॅन रिन यांनाही दोषी ठरवत त्यांनाही जन्मठेप ठोठावण्यात आली आहे.

देशभरात सहानुभूतीची लाटही घटना २०२४ च्या फेब्रुवारी महिन्यात उघडकीस आली होती. स्मिथची मुलगी जोशलिन अचानक गायब झाली, तेव्हा या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी संपूर्ण देश एकवटला होता. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अनेकांना तिच्या आईबद्दल सहानुभूती वाटत होती. मात्र, पोलीस तपास जसजसा पुढे गेला, तसतसे या प्रकरणाचे भयावह सत्य उघड होत गेले.

२०,००० रँडमध्ये विक्री आणि काळी जादू

तपासात समोर आले की, रॅक्वेल स्मिथने तिच्या मुलीला एका तांत्रिकाला अवघ्या २०,००० रँडमध्ये विकले होते. या तांत्रिकाने ० काळ्या जादूसाठी मुलीचे डोळे आणि त्वचेची मागणी केली होती. विशेष म्हणजे केवळ ड्रग्जसाठी पैशांची गरज असल्याने आईने हे पाऊल उचलले होते. मुलीच्या शरीराचा वापर तांत्रिक विधीसाठी होणार होता, हे समजताच देशभरात संतापाची लाट उसळली.

न्यायालयाचा कठोर निर्णय

या खटल्याची सुनावणी जवळपास आठ आठवडे चालली. समाजातील वाढता प्रक्षोभ लक्षात घेता, न्यायालयीन प्रक्रिया इतकी महत्त्वाची ठरली की, लोकांना सहभागी होता यावे म्हणून ती एका स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आली.

न्यायाधीश नॅथन इरास्मस यांनी आपल्या निकालात स्पष्टपणे नमूद केले की, या गुन्ह्यातील आरोपींमध्ये कोणताही पश्चात्ताप दिसत नाही. त्यामुळे या क्रूर आणि अमानवी कृत्याबद्दल त्यांना सर्वात कठोर शिक्षा म्हणजेच जन्मठेप देणे आवश्यक आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीInternationalआंतरराष्ट्रीय