शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आई मुलीसोबत गेली हनिमूनला; पुढे जे घडलं ते वाचून धक्का बसेल तुम्हाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 17:40 IST

चक्रावून टाकणारी घटना १० वर्षांनंतर समोर

लंडन: आई आपल्या मुलांसाठी काहीही करते. लेकरांसाठी ती आयुष्यभर खस्ता खाते. आपल्याला आयुष्यात जे सुख मिळालं नाही, ते आपल्या मुलांना मिळावं यासाठी आई कष्ट घेते. मुलांच्या डोळ्यात अश्रू आले की आईलाही दु:ख होतं. आई आणि तिच्या लेकरांचं नातं शब्दांत व्यक्त करता येणं तसं कठीणच. मात्र या सगळ्याला छेद देणारी एक घटना लंडनमध्ये घडली. एका आईनं तिच्याच लेकीचा संसार मोडला. mirror.co.uk नं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.लंडनच्या ट्विकेनहॅममध्ये राहणाऱ्या लॉरन वॉल नावाच्या तरुणीनं १० वर्षांपूर्वी पॉल नावाच्या तरुणाशी लग्न केलं. १० वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेबद्दल लॉरेन आता व्यक्त झाली. लग्नानंतर अवघ्या दोनच महिन्यात पॉलनं घर सोडलं. यामुळे लॉरनला मोठा धक्का बसला. पॉल आपल्याच आईसोबत राहत असल्याची माहिती लॉरनला काही नातेवाईकांकडून समजली. त्यामुळे तिला आणखी जबरदस्त मानसिक हादरा बसला. आपली आई असं वागेल, याची तिला जराही कल्पना नव्हती. लॉरन आणि पॉलच्या लग्नात लॉरनची आई ज्युलीनं जवळपास १४ लाख रुपये खर्च केले. त्यामुळे लॉरेन अतिशय आनंदी होती. त्यामुळे ती आईलादेखील हनिमूनला घेऊन गेली. हनीमूनवरुन परतल्यानंतर ज्युली आणि पॉल सोबत राहू लागले. आईनं विश्वासघात करुन संसार मोडल्यानं लॉरेनला धक्का बसला. यानंतर काही महिन्यांतच ज्युली यांनी एका मुलाला जन्म दिला. काही वर्षांनी ज्युली आणि पॉल यांनी लग्न केलं. दोघांच्या विवाहाला लॉरेनदेखील हजर होती. घडलेल्या प्रकारात आपली कोणतीही चूक नसल्याचा दावा ज्युली यांनी सुरुवातीला केला. मात्र त्यानंतर त्यांनी स्वत:ची चूक मान्य केली. पण पॉलनं कधीही लॉरेनची माफी मागितली नाही. आई आणि नवऱ्यानं केलेल्या विश्वासघातामुळे आपल्याला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागले. त्यामुळे आपण आयुष्यात कधीही आईला माफ करणार नाही, अशा शब्दांत लॉरेननं तिच्या भावना व्यक्त केल्या.