जगातील सर्वात महागडं औषध वाचवणार 5 महिन्यांच्या बाळाचा जीव, 17 कोटींच्या इंजेक्शनचा पहिल्यांदाच वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 11:39 AM2021-06-02T11:39:37+5:302021-06-02T11:41:21+5:30

या आजाराने पीडित अर्ध्यावर मुले दोन वर्षांहून अधिक काळ जगू शकत नाहीत. या औषधाच्या एका डोसची किंमत £17 लाख अर्थात जवळपास 16.9 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.

Most expensive drug zolgensma gene therapy given to baby from England | जगातील सर्वात महागडं औषध वाचवणार 5 महिन्यांच्या बाळाचा जीव, 17 कोटींच्या इंजेक्शनचा पहिल्यांदाच वापर

जगातील सर्वात महागडं औषध वाचवणार 5 महिन्यांच्या बाळाचा जीव, 17 कोटींच्या इंजेक्शनचा पहिल्यांदाच वापर

googlenewsNext

लंडन - पाच महिन्याच्या आर्थर मॉर्गनला एक असा आजार जडला आहे, ज्यामुळे त्याचे स्नायू नष्ट होत राहतात. जगभरात दरवर्षी 60 मुलांना या घातक आजाराचा सामना करावा लागतो. स्पाइनल मस्क्युलर अॅट्रॉफी (Spinal Muscular Atrophy), असे या आजाराचे नाव आहे. या आजाराने पीडित अर्ध्यावर मुले दोन वर्षांहून अधिक काळ जगू शकत नाहीत. मात्र, काही वर्षांपूर्वी या आजारावर विजय मिळविण्यासाठी एक आशा पल्लवित झाली आहे आणि आज या आजारावरील उपचार जगातील सर्वात महागड्या औषधाने शक्य झाला आहे. या औषधाच्या एका डोसनेच मुलांमध्ये अत्यंत चांगला परिणाम दिसून आला आहे. 

जीव वाचवू शकण्याचा दावा -
रीस आणि रोजी यांचा मुलगा आर्थरला सरळ बसण्यास आणि डोकं सरळ ठेवण्यास त्रास होत होता. तीन आठवड्यानंतर त्याला Zolgensma देण्यात आले. अमेरिकेत तयार झालेले हे औषध जगातील सर्वात महागडे औषध असल्याचे मानले जाते. या औषधाच्या एका डोसची किंमत £17 लाख अर्थात जवळपास 16.9 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. अभ्यासात दिसून आले आहे, की हे औषध पॅरॅलेसिसपासून वाचवू शकते. हे औषध IV ड्रिपने दिले जाते आणि असे प्रोटीन तयार करते, जे SMA रुग्णांत तयार होत नाही.

Black Fungus : एका आठवड्यात ब्लॅक फंगसचं औषध देणार, काम अंतिम टप्प्यात; स्वामी रामदेवांचा मोठा दावा

कशामुळे होतो हा आजार?
ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सिस्टिम (NHS)ने Novartis Gene Therapies बरोबरच यासाठी डील केली आहे. SMA एक असा आजार आहे, ज्याच्या टाइप-1 मध्ये स्नायू नष्ट होऊ लागतात. यामुळे शरीरात SMN नावाचे प्रोटीन तयार होणे बंद होते. हे प्रोटीन स्नायुंच्या विकासासाठी आणि हालचालीसाठी आवश्यक असते. वेळेनुसार छातीचे स्नायूही नष्ट होऊ लागतात. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि मुलांचे दोन वर्षांपेक्षा अधिक जगणे अवघड होते.

आर्थरला देण्यात आले औषध - 

IIT हैदराबादची कमाल, आता ओरल सोल्यूशन ब्लॅक फंगसचा सामना करणार; फक्त 200 रुपयांत औषध मिळणार

3 वर्षांपूर्वीच सापडले औषध -
साधारणपणे तीन वर्षांपूर्वीच 2017 मध्ये न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, ज्या 15 मुलांना  हे इंजेक्शन देण्यात आले, ती सर्व मुले 20 महिन्यांपर्यंत जिवंत राहू शकले. तर या पूर्वीच्या संशोधनात केवळ 8 टक्के मुलेच जिवंत राहू शकली होती, ज्यांच्यावर कसल्याही प्रकारचा उपचार करण्यात आला नाही. 15 पैकी 12 मुलांना अधिक डोस देण्यात आला होता आणि 20 महिने वय असताना 11 मुले कुणाचीही मदत न घेता बसू शकत होते आणि दोन मुलांना चालताही येत होते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, या औषधामुळे या मुलांना व्हेंटीलेटरवर ठेवायची आवश्यकता भासत नाही. या उपचारांचा शोध नुकताच लागला आहे. त्यामुळे पुढील काळात याचे परिणाम कसे येतात, ते पाहावे लागेल.
 

Web Title: Most expensive drug zolgensma gene therapy given to baby from England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.