शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मालीमध्ये सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, 73 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 14:18 IST

माली सरकारने मृतांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला आहे.

आफ्रिकन देश मालीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे सोन्याची खाण कोसळून आतापर्यंत 73 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले होते, ते आता थांबवण्यात आले आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 73 जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच, माली सरकारने मृतांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला आहे.

वृत्तसंस्थेनुसार, मालीची गणना आफ्रिकेतील अत्यंत गरीब देशांमध्ये केली जाते. मात्र, याठिकाणी सोन्याचे मोठ्या प्रमाणात सोन्याचे उत्खनन होते. मालीमध्ये भूस्खलनामुळे खाण कोसळणे सामान्य आहे. मात्र, भूस्खलनामुळे खाण कोसळून मृत्यू झाल्याची इतकी मोठी घटना अनेक दिवसांनी घडली आहे. तर येथील खाणीत काम करणाऱ्या कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

या दुर्घटनेनंतर माली सरकारने एक निवेदन जारी करून खाण कामगारांना आवाहन केले आहे. खाणकामात असलेल्या कामगारांना सुरक्षा उपकरणे पुरविली पाहिजेत, असे सरकारने म्हटले आहे. दरम्यान, मालीमधील खाण क्षेत्रावर कॅनडाचे बॅरिक गोल्ड, बी2गोल्ड, ऑस्ट्रेलियाचे रिझोल्युट मायनिंग, ब्रिटनचे हमिंगबर्ड रिसोर्सेस यासह अनेक परदेशी कंपन्यांचा ताबा आहे. मालीमध्ये वर्षानुवर्षे राजकीय अस्थिरता असूनही या कंपन्या येथे खाणकाम सुरू ठेवतात.

दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात खाणकाम आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये सोन्याचे साठे आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात सोन्याचे उत्खनन होते. इतकंच नाही तर वर्ल्ड ऑफ द गोल्ड सिटी देखील दक्षिण आफ्रिकेत आहे. विटवॉटरसँड नावाची ही खाण दक्षिण आफ्रिकेच्या गौतेंग प्रांतात आहे, जिथे सर्वात मोठे शहर जोहान्सबर्ग आहे. जगातील एकूण सोन्याच्या उत्पादनापैकी 40 टक्क्यांहून अधिक सोन्याचा साठा येथे आहे. टेकड्यांवर वसलेले जोहान्सबर्ग शहर सोन्याच्या खाणी खोदल्यामुळे वसले असे म्हणतात. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयGoldसोनं