South Africa Penguins : दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्यावर अफ्रीकन पेंग्विनची संख्या झपाट्याने घटत आहे. नव्या संशोधनानुसार, गेल्या काही वर्षांत 60,000 पेक्षा जास्त पेंग्विन्सचा अन्नाविना मृत्यू झाला आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे, त्यांचे प्रमुख अन्न असलेले सार्डीन मासे जवळजवळ नष्ट झाले आहेत.
दोन मोठ्या कॉलनीतील 95% पेंग्विन्सचा मृत्यू
2004 ते 2012 या काळात डॅसन आयलंड आणि रॉबेन आयलंड या दोन सर्वात मोठ्या पेंग्विन कॉलनीमध्ये 95% पेंग्विन नष्ट झाले आहेत. संशोधकांच्या मते, पंख बदलण्याच्या (मॉल्टिंग) काळात अन्न मिळाले नाही, त्यामुळे हे पेंग्विन उपाशीपोटी मृत झाले.
मॉल्टिंग हा 21 दिवसांचा टप्पा असतो. या काळात पेंग्विन समुद्रात जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ते आधी शरीरात पुरेसा चरबीचा साठा करतात. मात्र, या टप्प्यात किंवा त्यानंतर अन्न मिळाले नाही तर त्यांचा ऊर्जा साठा संपतो आणि मृत्यू ओढवतो.
हवामान बदल + अतिमासेमारी = मोठा धोका
समुद्राचे वाढते तापमान, खारटपणातील बदल आणि अतिमासेमारीमुळे सार्डीन माशांचे प्रमाण धोकादायक पातळीवर घटले आहे. 2004 नंतर, फक्त तीन वर्षे सोडता, दक्षिण आफ्रिकेत सार्डीनचे प्रमाण सर्वोच्च पातळीच्या 75% पर्यंत कमी झाले आहे.
आता केवळ 10,000 जोडपे उरले
2024 मध्ये अफ्रीकन पेंग्विनला गंभीरपणे संकटग्रस्त प्रजाती (Critically Endangered) घोषित केले गेले. संपूर्ण जगात आता फक्त 10,000 प्रजननक्षम जोडपी उरली आहेत. 30 वर्षांत त्यांची संख्या 80% ने कमी झाली आहे.
संरक्षणासाठी केले जात असलेले प्रयत्न
सहा प्रमुख कॉलनीजवळ व्यावसायिक मासेमारीवर बंदी, पिल्लांसाठी सुरक्षित कृत्रिम घरटी, आजारी व अशक्त पेंग्विनना मानवी मदत आणि सील, शार्क सारख्या शिकाऱ्यांना कॉलनीपासून दूर ठेवले जात आहे.
शास्त्रज्ञांचा इशारा
ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटरचे डॉ. रिचर्ड शर्ले म्हणतात, 2011 नंतर परिस्थिती आणखी बिघडली आहे. जर सार्डीनचे प्रमाण लवकर वाढवले नाही, तर अफ्रीकन पेंग्विन काही वर्षांत नष्ट होतील. दक्षिण आफ्रिकेतील सागरी जीवशास्त्रज्ञ प्रो. लोरिएन पिचेग्रू यांच्या मते, ही फक्त पेंग्विनची समस्या नाही. अनेक सागरी प्रजाती त्याच अन्नसाखळीवर अवलंबून आहेत. लहान माशांचे संरक्षण केले नाही, तर संपूर्ण समुद्री पर्यावरण ढासळेल.
Web Summary : Over 60,000 African penguins died in South Africa due to starvation linked to dwindling sardine populations from climate change and overfishing. Only 10,000 breeding pairs remain, prompting conservation efforts like fishing bans and artificial nests to avert extinction.
Web Summary : दक्षिण अफ्रीका में जलवायु परिवर्तन और अत्यधिक मछली पकड़ने के कारण सार्डिन मछली की कमी से 60,000 से अधिक अफ्रीकी पेंगुइन भूख से मर गए। अब केवल 10,000 प्रजनन जोड़े बचे हैं, जिससे विलुप्त होने से बचाने के लिए मछली पकड़ने पर प्रतिबंध और कृत्रिम घोंसले जैसे संरक्षण प्रयास किए जा रहे हैं।