शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अधिक धोका त्याला श्वास घेण्यात अडथळा, तिला छातीत दुखते! पुरुष, स्त्रियांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे वेगवेगळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 07:06 IST

डॉ. सुमीत चुग यांच्या नेतृत्वाखालील संशोधनात असे आढळले की हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी महिलांना श्वास घेण्यास त्रास होतो, तर पुरुषांना छातीत दुखते.

न्यूयॉर्क : हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे महिला आणि पुरुषांमध्ये भिन्न असतात. ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून धोका टाळता येतो, असा दावा अमेरिकेच्या स्मिड्ट इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांच्या संशोधनात केला. आरोग्यविषयक नियतकालिक लॅन्सेटमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, ५०% लोकांना हृदयविकाराच्या २४ तास आधी लक्षणे दिसतात. डॉ. सुमीत चुग यांच्या नेतृत्वाखालील संशोधनात असे आढळले की हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी महिलांना श्वास घेण्यास त्रास होतो, तर पुरुषांना छातीत दुखते. दोघांनाही धडधडणे आणि फ्लूसारखी लक्षणे जाणवतात. 

अहवाल काय म्हणताे?हृदयविकाराचा झटका आलेल्या ९० टक्के लोकांचा हॉस्पिटलबाहेर मृत्यू होतो. कोरोनानंतर हृदयाशी संबंधित आजार गंभीर झाल्याचे तज्ज्ञांना आढळून आले आहे. शारीरिक हालचालींचा अभाव, खाण्याच्या सवयींत गडबड, ताणतणाव वाढल्याने हृदयविकारही वाढले आहेत.

नेमका कुणाला? संशोधनानुसार, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका अधिक धोकादायक ठरू शकतो. वेळेवर उपचार न मिळाल्याने धोका आणखी वाढतो. पहिल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर पाच वर्षांच्या आत मृत्यू, हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोका स्त्रियांमध्ये ४७% आढळून आला, तर पुरुषांमध्ये हे प्रमाण ३६% आहे. हृदयविकाराचा अचूक अंदाज येण्यासाठी आणखी संशोधनाची गरज असल्याचे सांगितले.

लक्षणे...पुरुष- छातीत दुखणे- अस्वस्थता- श्वास घेण्यास त्रास- डावा हात, जबडा दुखणे- मळमळ होणे

स्त्रिया- श्वास लागणे, घाम येणे- पाठ, मान, जबडा दुखणे- छातीत जळजळ - चक्कर येणे, मळमळ

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHealthआरोग्य