शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

CoronaVirus News: अमेरिकेतील ९७ हजार शाळकरी मुलांना कोरोना विषाणूची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 2:18 AM

शाळा पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयास पालकांकडून होतोय विरोध

वॉशिंग्टन : जुलैच्या शेवटच्या दोन आठवड्यांत अमेरिकेतील ९७ हजार शाळकरी मुलांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. अमेरिकेतील काही प्रांतांत नव्या सत्रासाठी शाळा सुरू झाल्या असून, काही प्रांतांत शाळा उघडण्याची तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हा अहवाल जाहीर झाल्याने पालकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.‘अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स’ या संस्थेने हा अहवाल जाहीर केला आहे. १६ जुलै ते ३0 जुलै या कालावधीत केलेल्या तपासणीत ९७ हजार मुले कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेत आतापर्यंत ५ दशलक्ष लोकांना कोरोनाची लागण झाली असून, त्यात लहान मुलांची संख्या ३,३८,000 आहे.अहवालात म्हटले आहे की, जुलै महिन्यात २५ मुलांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. मेपासून ८६ मुले कारोनामुळे मृत्युमुखी पडली आहेत. गेल्या आठवड्यात जॉर्जिया प्रांतात एक ७ वर्षीय मुलगा मरण पावला. हा या प्रांतातील सर्वाधिक कमी वयाचा कोरोना बळी ठरला आहे. या महिन्यातील दोन मुलांच्या मृत्यूनंतर फ्लोरिडामधील मुलांच्या मृत्यूचा आकडा ७ झाला आहे.सूत्रांनी सांगितले की, अमेरिकेतील शाळा मार्चपासून बंद आहेत. अशा १३ हजार शाळांच्या अधिकाऱ्यांवर मुलांना पुन्हा शाळेत आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू क्युओमो यांनी सांगितले की, शुक्रवारपासून एनवायसीमधील शाळा पुन्हा सुरू होत आहेत.विद्यापीठे, महाविद्यालयेही होणार सुरू; जमावबंदीसह कडक नियमअमेरिकेतील काही विद्यापीठे आणि महाविद्यालयांनीही प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. कॅम्पसमध्ये येण्यासाठी विद्यार्थ्यांना कोरोना तपासणीची सक्ती केली जाणार आहे.त्याचप्रमाणे मास्क घालणे आणि शारीरिक अंतर राखणे यासारखे नियमही करण्यात आले आहेत. कॅम्पसमध्ये १५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे.शैक्षणिक संस्थांच्या या निर्णयास काही नागरिकांनी विरोध चालविला असून, सार्वजनिक सुरक्षेपेक्षा नफेखोरीला महत्त्व देण्याचा हा प्रकार असल्याची टीका केली जात आहे.न्यू ओर्लियन्समधील खाजगी विद्यापीठ ‘ट्युलेन युनिव्हर्सिटी’ १९ आॅगस्टपासून सुरू होत आहे. या विद्यापीठात १३ हजार विद्यार्थी आहेत. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना शहरातील एका हॉटेलात उभारण्यात आलेल्या ‘आगमन केंद्रा’त दोन दिवस थांबून कोविड-१९ तपासणी करून घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका