शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

अमेरिकेत कोरोनामुळे 40 भारतीयांचा मृत्यू, 1,500 हून अधिक संक्रमित; मृतांमध्ये 'या' राज्यातील लोक सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 15:38 IST

विविध समुदायांतील नेत्यांनी जारी केलेल्या एका यादीनुसार, न्यूजर्सी राज्यात 12 हून अधिक भारतीय-अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला. तर याच प्रकारे न्यूयॉर्कमध्ये 15, पेन्सिल्वेनिया आणि फ्लोरिडातही 4, तर  टेक्सास आणि कॅलिफोर्नियामध्ये प्रत्येकी एका भारतीय-अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाल्याचे समजते.

ठळक मुद्देजगात कोरोना बाधितांची संख्या 16 लाख 50 हजारहून अधिकअमेरिकेत 1500 हून अधिक नागरिकांना कोरोनाची लागणजगभरात 3 लाख  68 हजार 668 लोक या आजारापासून बरे झाले आहेत

वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोनाने हाहाकार घातला आहे. कोरोनामुळे एकाज दिवसात 2000 हून अधिक मृत्यूची नोंद होणारा अमेरिका हा जगातील पहिला देश ठरला आहे. यातच आता 40 हून अधिक भारतीय-अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला असून तब्बल 1500 हून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

अमेरिकत कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकांमध्ये 17 जण केरळमधील, 10 जण गुजरातमधील, 4 जण पंजाबमधील, 2 जण आंध्र प्रदेशातील तर 1जण ओडिशातील आहे. यात अधिकांश लोक 60 वर्षांहून अधिक वय असलेले आहेत. एक एक जण 21 वर्षांचा आहे.

विविध समुदायांतील नेत्यांनी जारी केलेल्या एका यादीनुसार, न्यूजर्सी राज्यात 12 हून अधिक भारतीय-अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला. तर याच प्रकारे न्यूयॉर्कमध्ये 15, पेन्सिल्वेनिया आणि फ्लोरिडातही 4, तर  टेक्सास आणि कॅलिफोर्नियामध्ये प्रत्येकी एका भारतीय-अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाल्याचे समजते.

न्यू यॉर्कमध्ये 1,000 हून अधिक भारतीय-अमेरिकन संक्रमित -याच बोरबर न्यूजर्सीमध्ये 400 हून अधिक आणि न्यू यॉर्कमध्ये 1,000 हून अधिक भारतीय-अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. न्यू यॉर्क शहरातील अनेक भारतीय-अमेरिकन टॅक्सी ड्रायव्हरचे कोरोना रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. मृतांमध्ये, सुन्नोवा अॅनालिटिकल इंकचे सीईओ हनमंथ राव मारेपल्ली यांचाही समावश आहे. त्यांचा मृत्यू न्यूजर्सीतील एडिसनमध्ये झाला आहे. ते तेथे पत्नी आणि दोन मुलींसह राहत होते.

जगात कोरोना बाधितांची संख्या 16 लाख 50 हजारहून अधिक -आतापर्यंत भारतासह संपूर्ण जगात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 16 लाख 50 हजारहून अधिक आहे. तर   एक लाखाहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 लाख  68 हजार 668 लोक या आजारापासून बरे झाले आहेत. संपूर्ण जगाच्या तुलनेत इटलीमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 18 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.  

अमेरिकेत गेल्या 24 तासांत 2,108 लोकांचा मृत्यू झाला - अमेरिकेतही कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाखांहून अधिक आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत दोन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जान्स हॉपकिंस युनिव्हर्सिने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या 24 तासांत 2,108 लोकांचा मृत्यू झाला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाUSअमेरिकाUnited StatesअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पhospitalहॉस्पिटल