शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

Coronavirus : अमेरिकेत कोरोनाची दहशत; 24 तासांत 100 जणांचा मृत्यू; सिनेटर रँड पॉलही संक्रमित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 10:47 AM

आतापर्यंत सर्वाधिक न्यूयॉर्क (114), वॉशिंग्टन (94) आणि कॅलिफोर्निया (28) जणांचा मृत्यू झाला असून, हे तिन्ही प्रांत कोरोनानं प्रभावित झालेले आहेत.

ठळक मुद्देअमेरिकासुद्धा कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. महासत्ता असलेल्या या देशात  24 तासांत 100 जणांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेत कोरोनानं मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 389वर गेली आहे. जॉन हॉपकिन्स विश्वविद्यालयानं मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी जारी केली आहे.

वॉशिंग्टनः अमेरिकासुद्धा कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. महासत्ता असलेल्या या देशात  24 तासांत 100 जणांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकेत कोरोनानं मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 389वर गेली आहे. जॉन हॉपकिन्स विश्वविद्यालयानं मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी जारी केली आहे. आतापर्यंत सर्वाधिक न्यूयॉर्क (114), वॉशिंग्टन (94) आणि कॅलिफोर्निया (28) जणांचा मृत्यू झाला असून, हे तिन्ही प्रांत कोरोनानं प्रभावित झालेले आहेत.अमेरिकेत जवळपास 30 हजार लोक या विषाणूनं संक्रमित झाले आहेत. विशेष म्हणजे संक्रमित होणाऱ्यांमध्ये अमेरिकेच्या सिनेटर रँड पॉल यांचाही समावेश आहे. रविवारी केलेल्या चाचणीत रँड पॉल पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉल यांच्या ऑफिसकडून ही माहिती देण्यात आली आहे. पॉल हे कोविड 19 विषाणूनं संक्रमित झाले आहेत. पण त्यांची प्रकृती ठीक आहे. रँड पॉल हे कोरोनानं संक्रमित झालेले अमेरिकेतले पहिले सिनेटर आहेत. पेशाने डॉक्टर असलेले पॉल म्हणाले की, सुरुवातीला कोरोनाची लक्षणे दिसली नाहीत, परंतु बराच प्रवास करण्याबरोबरच इतर कार्यक्रमांना उपस्थित राहत असल्यानं त्यांची खबरदारीसाठी चाचणी घेण्यात आली. त्यावेळी ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच संक्रमित व्यक्तीशी थेट संपर्कात आलो की नाही, याबाबत माहिती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.  सगळ्यांची होणार चाचणीरविवारी सकाळी पॉल आपल्या सहकारी कर्मचार्‍यांसह जिममध्ये गेले होते. त्यानंतर  त्यांनी रिपब्लिकनच्या सिनेटरसमवेत दुपारचे जेवण केले होते. यात सामील असलेले सर्वजण घाबरलेले आहेत. सिनेटचे सदस्य असलेले जेरी मॉरॉन म्हणाले, "मी रविवारी पॉल जलतरण तलावात स्नान करत होते. सीएनएनच्या मते, पॉल यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची चाचणी घेतली जाईल.अमेरिकेत पसरलं भीतीचं वातावरणअमेरिकाही वाईट पद्धतीनं कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे.  व्यवसाय बंद झाले आहेत, लोकांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्यात येत आहे. शाळा बंद आहेत आणि लोक घरात नजरकैद झाले आहेत. अशा परिस्थितीत देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर एक मोठे आव्हान आहे. कोरोना व्हायरस आणि लॉक डाउनबद्दल लोकांमध्ये भीती आहे. अमेरिकेतील लोकांनी बाजारपेठा रिकामी केल्या आहेत. कॅलिफोर्निया, इलिनॉय, न्यूयॉर्क आणि कनेक्टिकटमधील 5..5 दशलक्ष लोकांना वेगवेगळे राहण्याची सूचना देण्यात आली आहे. अमेरिकी सरकारनं काही नियम जारी केले असून, त्याचं उल्लंघन केल्यास लोकांकडून दंड आकारला जाणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या