शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Monkeypox : जगातील 60 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सचा धोका; WHO कडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 22:58 IST

Monkeypox :मंकीपॉक्सचा धोका जागतिक स्तरावर दिसून येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या प्राणघातक व्हायरसचा धोका युरोपीय देशांमध्ये सर्वाधिक आहे.

नवी दिल्ली : मंकीपॉक्स व्हायरस जगातील 60 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. या आजाराबाबत आता जागतिक आरोग्य संघटनेने मोठी घोषणा केली आहे. मंकीपॉक्सचा धोका जागतिक स्तरावर दिसून येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या प्राणघातक व्हायरसचा धोका युरोपीय देशांमध्ये सर्वाधिक आहे.

सध्याची परिस्थिती पाहता, त्याचा आणखी आंतरराष्ट्रीय प्रसार होण्याचा स्पष्ट धोका आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय वाहतुकीत व्यत्यय येण्याचा धोका सध्या कमी आहे. सर्व धोके लक्षात घेऊन, जागतिक आरोग्य संघटनेने  मंकीपॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस यांनी शनिवारी सांगितले की, वेगाने पसरणारा मंकीपॉक्सचा उद्रेक जागतिक आरोग्य आणीबाणीचे प्रतिबिंबित करतो. जागतिक आरोग्य आणीबाणी ही जागतिक आरोग्य संघटनेची सर्वोच्च पातळीचा इशारा आहे. आता मंकीपॉक्सबाबत आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियेची गरज आहे. यासोबतच, लस आणि उपचार शेअर करण्यासाठी निधी आणि जागतिक प्रयत्नांची गरज आहे.

जिनिव्हा येथे मीडिया ब्रीफिंग दरम्यान आरोग्य आणीबाणी घोषित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या वर्षी आतापर्यंत 60 हून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्सची 16,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि आफ्रिकेत या आजारामुळे 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात वेगाने पसरत असलेल्या मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव योग्य गटांमध्ये योग्य रणनीतीने रोखला जाऊ शकतो, असे जागतिक आरोग्य संघटने म्हटले आहे. 

तसेच, या रोगाला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करत आहेत, कारण  मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी सर्व देशांनी एकत्रितपणे प्रभावी माहिती आणि सेवा तयार करणे आणि वितरित करणे अत्यावश्यक आहे, असेही जागतिक आरोग्य संघटने म्हटले आहे. 

मंकीपॉक्सची लक्षणं काय आहे? तज्ज्ञांच्या मते 'मंकीपॉक्स' हा एक दुर्मिळ व्हायरस आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याचबरोबर ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात. 

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाHealthआरोग्य