शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

कोरोनानंतर आता मंकीपॉक्स महामारी?; WHO चा मोठा दावा, आतापर्यंत २४ देशांत पसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 15:01 IST

२०२२ मध्ये आफ्रिकन देश काँगोमध्ये मंकीपॉक्समुळे नऊ लोकांचा मृत्यू झाला होता, तर नायजेरियामध्ये या वर्षी या आजाराने पहिला मृत्यू नोंदवला गेला.

जिनेवा - जगभरात मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णसंख्या आणि २४ देशात ४३५ हून अधिक रुग्ण आढळल्यानं जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. कोरोनानंतर मंकीपॉक्सची जागतिक महामारीचं कारण बनू शकतं. आफ्रिकेच्या बाहेर अनेक देशात या आजाराबाबत अद्याप काही माहिती मिळू शकली नाही असं WHO नं सांगितले आहे. 

अहवालात म्हटलं आहे की, कोविड 19 सारखा या विषाणूकडे पाहू नये. सर्वसामान्यांना कमी धोका आहे. 'आम्हाला लोकांनी घाबरण्यासाठी आणि हे कोविड 19 सारखे किंवा कदाचित वाईट आहे असा विचार करू नये. मंकीपॉक्स हा कोरोनासारखा नसून तो वेगळा विषाणू आहे. व्हायरसच्या अनुवांशिक स्वरूपाबद्दल आरोग्य तज्ञ स्पष्ट नाहीत असं डब्ल्यूएचओच्या संचालक सिल्वी ब्रायंड यांनी एका ब्रीफिंग दरम्यान सांगितले.

सध्याचा डेटानुसार, कोविड 19 आणि आरएनए व्हायरससारख्या इतर विषाणूंप्रमाणे ते सहजपणे प्रसारित होत नाही. मंकीपॉक्सबाबत डब्ल्यूएचओचे अधिकारी रोसामुंड लुईस यांनी सांगितले की, या क्षणी आम्हाला जागतिक महामारीची चिंता नाही. मात्र, वाढती प्रकरणे त्यांच्या चिंतेचे कारण असल्याचे त्यांनी मान्य केले. हा विषाणू प्रथम समलिंगी आणि उभयलिंगी पुरुषांमध्ये दिसून आला.

मात्र, विषाणूची व्याख्या लैंगिक संक्रमित रोग म्हणून केलेली नाही. लुईस यांनी समलिंगी पुरुषांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. लुईस म्हणाले की एकत्रितपणे, जगाला हा संसर्ग रोखण्याची संधी आहे. २०२२ मध्ये आफ्रिकन देश काँगोमध्ये मंकीपॉक्समुळे नऊ लोकांचा मृत्यू झाला होता, तर नायजेरियामध्ये या वर्षी या आजाराने पहिला मृत्यू नोंदवला गेला. अनेक वर्षांनंतर मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव अचानक समोर आला आहे. पश्चिम आणि मध्य आफ्रिकेला मंकीपॉक्सचा सर्वाधिक फटका बसतो.

भारतात सतर्कताजगात कोरोनानंतर आता एक नवीन संसर्ग वेगाने पसरत आहे, ज्याचे नाव 'मंकीपॉक्स' (Monkeypox) आहे. ताज्या अहवालानुसार, आतापर्यंत जगभरात मंकीपॉक्सचे ४३५ हून अधिक रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण यूके, युरोपियन देश, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह २४ देशांमध्ये आढळून आले आहेत. मात्र, भारतात अद्याप एकही केस आढळलेला नाही परंतु सतर्कता वाढली आहे. मंकीपॉक्स व्हायरसबाबत मुंबई विमानतळ आणि मुंबई महापालिका सतर्क आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना