शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! 3 वर्षांच्या मुलीला माकडाने पळवून नेलं, डोंगरावरून खाली फेकलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 10:49 IST

एका माकडाने मुलीला तिच्या आई-वडिलांसमोरूनच उचलून नेलं आहे.

अनेक वेळा माकडांमुळे लोकांना समस्यांना सामोरे जावे लागते. ते लोकांच्या सामानाची चोरी तर करतातच पण लहान मुलांनाही धोका निर्माण करतात. असाच काहीसा प्रकार एका तीन वर्षांच्या मुलीसोबत घडला. एका माकडाने मुलीला तिच्या आई-वडिलांसमोरूनच उचलून नेलं आहे. हे प्रकरण चीनच्या दक्षिण-पश्चिम गुइझोउ प्रांताचं आहे. मुलीचे आई-वडील शेतात काम करत असताना तेथे एक माकड आलं. तो तिला उचलून घेऊन गेला. मुलीचा बराच शोध घेण्यात आला मात्र ती सापडली नाही.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, त्याला शोधण्यासाठी कुटुंबीयांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोध घेतला. बराच शोध घेतल्यानंतर ही मुलगी पोलिसांना सापडली. मुलीला डोंगरावरून फेकून दिलं होतं. सुदैवाने तिला दुखापत झाली नाही. ती झुडपात पडली होती. मुलीचे वडील लियू यांनी सांगितलं की त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या मुलीला झाडाच्या सावलीत बसवलं होतं. त्याचं लक्ष काही सेकंदांसाठी दुसरीकडे गेलं आणि तोपर्यंत मुलगी तिथून बेपत्ता झाली.

लियू म्हणाले, 'मुलीची आई लगेच रडू लागली आणि मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि मी पोलिसांशी संपर्क साधला.' यानंतर हे लोक जवळच्या गावात गेले. त्यांना एक व्हिडीओ सापडला ज्यामध्ये एक जंगली माकड तीन वर्षांच्या मुलीला घेऊन जाताना दिसत आहे. एका गावकऱ्याने सांगितले की, त्याने घटनास्थळी एक मोठं माकड फिरताना पाहिलं आहे. मुलगी बेपत्ता झाल्यामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत आहे.

मुलगी अतिशय घाबरलेल्या अवस्थेत सापडली. तिला विचारण्यात आलं की माकडाने तिला पळवून नेलं आहे का? तर त्याने हो असं उत्तर दिलं. असं विचारल्यानंतर माकड कुठे गेलं? विचारलं. तेव्हा तिने डोंगराकडे बोट दाखवलं. मुलगी सुखरूप सापडल्याबद्दल पोलिसांचे आभारी असल्याचे लियू यांनी सांगितलं. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली. मुलीची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Monkeyमाकड