शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जगातील १९ देशांत मंकीपॉक्स, लैंगिक संबंधांतून पसरला रोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 07:32 IST

१३१ रुग्ण, तर १०६ संशयित; लैंगिक संबंधांतून पसरला रोग

नवी दिल्ली : कोरोना साथीनंतर आता जगभरात मंकीपॉक्सने भीती वाढविली आहे. आतापर्यंत १९ देशांत मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील १३१ रुग्णांना मंकीपॉक्स असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर १०६ संशयित रुग्ण आहेत. 

स्पेन आणि बेल्जियममध्ये हा रोग लैंगिक संबंधातून पसरला असल्याचे सांगण्यात येत आहे. ब्लूमबर्ग ओपिनियनचे बॉबी घोष यांनी सोशल मीडियावरील एका लाइव्ह कार्यक्रमात सांगितले की, हा चिकनपॉक्ससारखा एक आजार आहे. अमेरिकेत २००३ मध्ये याचे ७१ रुग्ण आढळले होते. घानाहून आयात केलेल्या उंदरामुळे हे घडल्याचे सांगितले जाते. याला मंकीपॉक्स संबोधले जात असले तरी, हा माकडापासून होत नाही. हा विविध प्रजातींना संक्रमित करू शकतो. 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे रिकार्डो जॉर्ज यांनी सांगितले की, पोर्तुगालमध्ये पसरलेला मंकीपॉक्स हा पश्चिम आफ्रिकेतील विषाणूपेक्षा कमी आक्रमक आहे. ही साथ आणखी पसरण्याची शक्यता असली तरी, यात दिलासा देणारी बाब अशी आहे की, हा संसर्ग आणखी गंभीर बनलेला नाही. यूएईत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. याची सुरुवात डोकेदुखी आणि तापेतून होते. अंगदुखी, सूज आणि पाठीत वेदना होतात. ताप आल्यानंतर साधारण तीन दिवसांनी अंगावर फोड, पुरळ येतात. याची सुरुवात चेहऱ्यापासून होते आणि शरीराच्या अन्य भागावर हे पुरळ येतात. हा संसर्ग साधारणपणे चार आठवड्यांपर्यंत राहतो.

या देशात झाला संसर्ग... ऑस्ट्रिया, स्लोव्हिनिया, झेक प्रजासत्ताक, यूएई, ब्रिटन, फ्रान्स, स्वीडन, इटली, स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, बेल्जियम, नेदरलँड, इस्रायल आणि स्वित्झर्लंड, उत्तर अमेरिका.

कसा पसरतो मंकीपॉक्स... एखादी व्यक्ती अन्य व्यक्तीच्या, जनावरांच्या अथवा विषाणूच्या संपर्कात आल्याने हा आजार पसरतो. हा विषाणू त्वचा, डोळे, नाक, तोंडाच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतो. उपचार म्हणून रुग्णाला विलगीकरणात ठेवले जाते. 

टॅग्स :MonkeyमाकडSexual Healthलैंगिक आरोग्यdoctorडॉक्टर