शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इराणच्या सर्वोच्च नेतेपदी मोजतबा खामेनेईंची निवड; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "बघुया, पुढे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 12:01 IST

मोजतबा खामेनेई यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली. या निवडीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. 

अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई हे मारले गेले. त्यानंतर सर्वोच्च नेता म्हणून कोण असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. इराणच्या धार्मिक परिषदेने मोजतबा खामेनेई यांची सर्वोच्च नेता म्हणून निवड केली. या निवडीबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. 

अयातुल्लाह अली खामेनेई यांचाच मुलगा मोजतबा खामेनेई यांची सर्वोच्च नेते म्हणून निवड झाली. त्यानंतर टाइम्स ऑफ इस्रायलशी बोलताना ट्रम्प यांनी एक विधान केले. ट्रम्प म्हणाले की, "बघूयात, पुढे काय होतंय ते. खामेनेईंचा मुलगा हा एक कमकुवत माणूस आहे आणि लोकांना न स्वीकारलेला उमेदवार आहे."

...तर जास्त काळ टिकणार नाही

मोजतबा खामेनेई यांच्या निवडीचे संकेत मिळत असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी भूमिका मांडली होती. एबीसी न्यूजशी बोलताना ट्रम्प यांनी म्हटले की, 'इराणच्या नव्या नेत्याचा कार्यकाळ हा अमेरिकेच्या समंतीवरच अवलंबून असेल. जर आमची त्याला मंजुरी नसेल, तर नवा नेता फार काळ टिकणार नाही.'

दरम्यान, फॉक्स न्यूजच्या कार्यक्रमात अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, 'या निवडीवर मी खूश नाहीये."  

जगाच्या शांततेसाठी ही खूप छोटी किंमत 

ट्रम्प यांनी मध्य पूर्वेतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेल संकटाबद्दलही भाष्य केले आहे. तेलाच्या किंमतीही वाढत असून, ट्रम्प म्हणाले की, 'कमी काळासाठी तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. इराणचा अणुऊर्जा धोका संपल्यानंतर हे दर झपाट्याने कमी होतील. अमेरिका आणि जगाच्या सुरक्षेसाठी, तसेच शांततेसाठी ही खूप छोटी किंमत आहे", अशी भूमिका ट्रम्प यांनी मांडली.

English
हिंदी सारांश
Web Title : Mojtaba Khamenei Chosen as Iran's Leader; Trump Reacts

Web Summary : Following Ayatollah Ali Khamenei's death, Mojtaba Khamenei was chosen as Iran's supreme leader. Trump stated Khamenei's son is weak and unpopular. He suggested the new leader's tenure depends on US approval, adding he was unhappy with the choice. Trump addressed rising oil prices, deeming them a small price for global peace.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणAmericaअमेरिकाWarयुद्ध