शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हृदयस्पर्शी! कोरोनात दोन्ही पाय गमावले पण 'तिने' हार नाही मानली; नव्या आयुष्याची सुरुवात केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 11:12 IST

Claire Bridges : कोरोनाची लागण झाल्यानंतर क्लेअर ब्रिजेसला लिव्हर डॅमेज, किडनी फेल्युअर, रॅबडोमायोलिसिस अशा समस्यांमधूनही जावं लागलं.

अमेरिकेत राहणाऱ्या क्लेअर ब्रिजेस (Claire Bridges) या 21 वर्षीय मॉडेलने कोरोना (COVID-19) उपचारादरम्यान तिचे दोन्ही पाय गमावले आहेत. पूर्ण लसीकरण करूनही तिला कोरोनाचा संसर्ग झाला. तिला जवळपास 2 महिन्यांनंतर नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कठीण परिस्थितीतून बाहेर पडून जिवंत राहिल्यानंतर क्लेअरला खूप आनंद झाला आहे. अशा परिस्थितीत देखील तिने हिंमत हारली नाही. तर पुन्हा एकदा आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. 

'डेली मेल'च्या वृत्तानुसार, मॉडेल आणि गिर्यारोहक क्लेअर ब्रिजेस फ्लोरिडामध्ये राहते. तिने कोरोनाची लसही (Corona Vaccine) घेतली होती. पण जानेवारीच्या सुरुवातीला ती कोविड पॉझिटिव्ह आली. लहानपणापासून हृदयविकाराने त्रस्त असलेल्या क्लेअरची प्रकृती कोरोना संसर्ग झाल्यानंतर आणखीनच बिघडू लागली. 16 जानेवारी रोजी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिला कोविड मायोकार्डिटिस, सायनोटिक ऍसिडोसिस, रॅबडोमायोलिसिस आणि न्यूमोनिया असल्याचं तपासणीत समोर आलं.

कोरोनाची लागण झाल्यानंतर क्लेअर ब्रिजेसला लिव्हर डॅमेज, किडनी फेल्युअर, रॅबडोमायोलिसिस अशा समस्यांमधूनही जावं लागलं. यादरम्यान पायांकडं जाणारा रक्तप्रवाह बंद झाल्यामुळं तिच्या पायांवर विपरीत परिणाम झाला. त्यामुळं डॉक्टरांना तिचे दोन्ही पाय कापण्याचा निर्णय घ्यावा लागला. रिपोर्टनुसार, क्लेअरला जन्मतःच महाधमनी वाल्व स्टेनोसिसनं (Aortic Valve Stenosis) झाला होता. वयाच्या नवव्या वर्षी तिच्यावर ओपन हार्ट सर्जरी झाली होती. 

जन्मापासूनच अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत होता. कोरोनाने तिचं आयुष्यच बदललं. मात्र, क्लेअरने हार मानली नाही. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती पुन्हा आनंदी जीवन जगत आहे. नुकताच क्लेअरनं 21 वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वडिलांनी सांगितलं की, ती वाचली यासाठी ती खूप खूश आहे. व्हीलचेअरवर बसून प्रसन्न हास्य करणाऱ्या क्लेअरचे अनेक क्यूट फोटो समोर आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या