शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Video: अमेरिकेतील भारतीय राजदूतांसोबत गैरवर्तन; खलिस्तानी समर्थकांनी केली धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 15:11 IST

भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांच्याशी गुरुद्वारात गैरवर्तन झाल्याची घटना घडली आहे.

न्यूयॉर्क: अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांना शीख फुटीरतावाद्यांकडून धक्काबुक्की झाल्याची घटना समोर आली आहे. न्यूयॉर्कमधील हिक्सविले गुरुद्वारामध्ये ही घटना घडली. सिख फॉर जस्टिस संघटनेशी संबंधित फुटीरतावाद्यांनी संधू यांना घेरण्याचा प्रयत्न केला. हरदीपसिंग निज्जरची हत्या आणि गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा प्रयत्नामुळे सर्वजण संतापले होते. या दोन्ही घटनांसाठी फुटीरतावादी नेते भारताला जबाबदार धरत होते आणि भारतीय राजदूताकडून उत्तर मागत होते. या घटनेनंतर संधू तात्काळ गुरुद्वारातून निघून गेले.

कॅनडात निज्जरची हत्या, भारतावर आरोपगुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करत अमेरिकेने अलीकडेच भारताला इशारा दिला होता. मात्र, या मुद्द्यावर भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच, या वर्षी जून महिन्यात खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरची कॅनडात हत्या करण्यात आली होती. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. भारत सरकारने कॅनडा सरकारचे आरोप निराधार असल्याचे म्हटले होते.

भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसांची प्रतिक्रियाराजदूत संधू यांच्याशी झालेल्या धक्काबुक्कीच्या वृत्तावर भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांची प्रतिक्रिया आली आहे. सिरसा म्हणाले की, भारतीय राजदूताचे वडील तेजा सिंग समुद्री यांनी स्वातंत्र्यापूर्वी गुरुद्वारासाठी 'की फ्रंट' लढाई लढली होती. त्यांच्याशी अशाप्रकारचे गैरवर्तन अजिबात योग्य नसून मी त्याचा निषेध करतो.

कोण आहे गुरपतवंत सिंग पन्नू?गुरपतवंत सिंग पन्नू पंजाबमधील शीखांसाठी वेगळ्या राज्याचे समर्थक आहेत. खलिस्तानच्या स्वतंत्र शीख राज्याची मागणी करणाऱ्या शीख फॉर जस्टिस (SFJ) चा तो प्रवक्ता आहे. पन्नू पंजाबमधील अमृतसरच्या खानकोटचा आहे. वडील मोहिंदर सिंग पंजाब स्टेट अॅग्रिकल्चरल मार्केटिंग बोर्डात काम करत होते. आईचे नाव अमरजीत कौर आहे. पन्नूला एक भाऊ देखील आहे ज्याचे नाव मगवंत सिंग पन्नू आहे. 2020 मध्ये भारत सरकारने त्याला दहशतवादी घोषित केले.

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय