शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सीरियातील सैनिकी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला, अनेकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 09:55 IST

सीरियातील सैनिकी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला असून, या हल्ल्यात अनेक लोक ठार झाल्याचे वत्त आहे. सीरियामधील सरकारी प्रसारमाध्यमांनी या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दमिश्क - सीरियातील सैनिकी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला असून, या हल्ल्यात अनेक लोक ठार झाल्याचे वत्त आहे. सीरियामधील सरकारी प्रसारमाध्यमांनी या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा हल्ला तैफूर एअरबेसवर करण्यात आला आहे. त्याआधी शनिवारी पूर्व घौऊतामध्ये झालेल्या रासायनिक हल्ल्यात 80 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.  गृहयुद्ध, दहशतवाद आणि अमेरिका आणि रशियाकडून सतत्याने करण्यात येत असलेल्या हल्ल्यांमुळे सीरिया बेचिराख झाला आहे.   सना या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार "तैफूर एअरपोर्टवर अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. आमची संरक्षण यंत्रणा या क्षेपणास्त्रांना पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे. या हल्ल्यात काही जणांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत. मात्र मृत आणि जखमींचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रासायनिक हल्ल्याच्या  केलेल्या निषेधानंतर हा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी रासायनिक हल्ल्याचा निषेध करताना सीरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांना इशारा दिला होता. तसेच ट्रम्प यांनी रासायनिक हल्ल्यासाठी रशिया आणि इराणलाही जबाबदार धरले होते.  बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या सीरियातील डोमा या शहरात शनिवारी झालेल्या रासायनिक हल्ल्यात ८० नागरिक मरण पावले होते. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या हल्ल्यासाठी सायनाइडपेक्षा वीसपट विषारी असलेले सरिन रसायन वापरण्यात आले. हल्ल्यामुळे बाधित झालेल्या लोकांची छायाचित्रे ‘व्हाईट हॅल्मेट रीलिफ आॅर्गनायझेशन’ने सोशल मीडियावर प्रसिद्ध केली. मृतांमध्ये महिला व मुलांचे प्रमाण अधिक आहे. ब्रिटनने म्हटले की, सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली आहे. निरपराध लोकांचा बळी घेतला आहे. हल्ल्याची तत्काळ चौकशी करण्यात यावी. यापूर्वीही अशाच प्रकारचा हल्ला झाला होता.   

टॅग्स :Syriaसीरियाnewsबातम्या