शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सीरियामध्ये हॉस्पिटलवर मिसाईलद्वारे भ्याड हल्ला; 18 ठार, 23 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 13:01 IST

Syria hospital attack: गव्हर्नर कार्यालयाने हल्ल्याच्या मागे ‘सीरियन कुर्दिश’ गटाचा हात असल्याचे म्हटले आहे. ब्रिटनमधील मानवाधिकार संघटना ‘सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्यूमन राइट्स’ने हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांची संख्या 18 सांगितली आहे. तर 23 लोक जखमी झाल्याचे म्हटले आहे. 

बैरूत: गृहयुद्धाशी झुंजत असलेल्या सीरियाच्या (Syria) उत्तरेकडील शहरातील एका हॉस्पिटलवर मिसाईल डागण्यात आले. यामध्ये दोन डॉक्टरांसह 18 जण ठार झाले आहेत. या शहरावर तुर्की समर्थकांचा कब्जा आहे. मानवाधिकार कार्यकर्ते आणि मदत गटाने याची माहिती दिली आहे. (Shelling of the rebel-held city of Afrin in northern Syria killed at least 18 people on Saturday.)

या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. हल्ला झालेल्या ठिकाणी सध्या सरकारी सैनिक आणि कुर्दचे लोक तैनात करण्यात आले आहेत. गव्हर्नर कार्यालयाने हल्ल्याच्या मागे ‘सीरियन कुर्दिश’ गटाचा हात असल्याचे म्हटले आहे. ब्रिटनमधील मानवाधिकार संघटना ‘सीरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्यूमन राइट्स’ने हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांची संख्या 18 सांगितली आहे. तर 23 लोक जखमी झाल्याचे म्हटले आहे. 

विरोधकांच्या ताब्यात असलेल्या भागात आरोग्य सेवा आणि सुविधा पुरविणाऱ्या ‘सीरियन अमेरिकन मेडिकल सोसाइटी’(एसएएमएस) ने सांगितले की, आफरीन शहराच्या अल शिफा हॉस्पिटलव दोन मिसाईल डागण्यात आली. यामुळे पॉलिक्लिनिक विभाग, आयसीयू आणि डिलिव्हरी विभाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. 

या संघटनांनी हॉस्पिटलवर हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तुर्कीच्या हताय प्रांताने या हल्ल्यासाठी कुर्द समूहाला जबाबदार ठरविले आहे. दुसरीकडे कुर्द संघटना ‘सीरियन डेमोक्रेटिक फोर्सेस’ चे प्रमुख  मजलूम अबादी यांनी आपला हात नसल्याचे म्हटले आहे. निष्पाप लोकांवर हल्ले करून त्यांना निशाना बनविण्याच्या हल्ल्यांचा आपण निषेध करत असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोपही केला आहे.

टॅग्स :Syriaसीरिया