शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेनंतर जपानमध्येही खळबळ, उत्तर कोरियानं क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 17:13 IST

जपानमधली सरकारी वाहिनी एनएचकेच्या कर्मचा-यानं चुकीचा संदेश पाठवल्यामुळे एकच गोंधळ उडाला. जपानच्या सरकारी वाहिनीच्या कर्मचा-यानं उत्तर कोरियानं जपानवर मिसाइल हल्ला केल्याचा संदेश पाठवला.

टोकियो- जपानमधली सरकारी वाहिनी एनएचकेच्या कर्मचा-यानं चुकीचा संदेश पाठवल्यामुळे एकच गोंधळ उडाला. जपानच्या सरकारी वाहिनीच्या कर्मचा-यानं उत्तर कोरियानं जपानवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा संदेश पाठवला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. परंतु पुढच्या पाचव्या मिनिटाला एनएचकेनं नागरिकांची माफी मागितली आहे. खरं तर एनएचके या वृत्तवाहिनीला दुसरा संदेश पाठवायचा होता. परंतु अनवधानानं या वाहिनीनं जपानवर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचा संदेश पाठवला. यासंदर्भात एनएचके या वृत्तवाहिनीनं माफीसुद्धा मागितली आहे. या सर्व प्रकाराला यंत्रणा जबाबदार नसल्याचंही एनएचकेनं सांगितलं आहे. कर्मचा-याच्या नजरचुकीमुळे त्याच्याकडून हा संदेश पुढे गेल्याचं एनएचकेनं मान्य केलं आहे.मात्र याची अद्यापही सविस्तर माहिती प्राप्त झालेली नाही. याआधीसुद्धा हवाई आपत्कालीन अधिका-यांच्या चुकीमुळे जपानवर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचा संदेश फोनवरून पाठवण्यात आला होता. तर आता पुन्हा काही दिवसांनंतर जपानमध्ये हाच प्रकार घडला आहे. एनएचकेला धोक्याची सूचना मिळाल्यानंतर असे संदेश पाठवले जात असून, हा संदेशही एखाद्या अधिका-याच्या नजरेखालून गेल्यानंतरच प्रसारित करण्यात आला असावा, असं मत एनएचके प्रसारकानं मांडलं आहे. 

क्षेपणास्त्र हल्ल्याच्या इशा-यानंतर अमेरिकेत खळबळक्षेपणास्त्राचा हल्ला होणार असल्याच्या चुकून दिल्या गेलेल्या इशा-याने अमेरिकेच्या हवाई बेटांवर भीतीचं वातावरण पसरलं होतं. स्थानिक वेळेनुसार, सकाळी 8.08 वाजता सर्व नागरिकांना मोबाईलवर एक आपत्कालीन अलर्ट आला. यात क्षेपणास्त्राचा हल्ला होणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. नागरिकांनी तत्काळ सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असेही निर्देश यात दिले होते. हा संदेश चुकीने गेला आणि त्यानंतर १० मिनिटात आपत्कालीन एजन्सीने ट्विट करत स्पष्ट केले की, असा कोणताही धोका नाही. अमेरिकेतील हवाई मार्गाच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा हल्ला होण्याची भीती आहे. त्यामुळे तातडीने सुरक्षित ठिकाणी आश्रयाला जा. ही कोणतीही ड्रील नाही,' असे त्यात मेसेजमध्ये म्हटले होते. मेसेजमध्ये ही कोणतीही ड्रील नसल्याचं लिहिण्यात आल्यामुळे नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली. 

टॅग्स :Japanजपान