शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

चमत्कार : ढिगाऱ्याखालून ४० तासांनी कुटुंबाची सुटका; तुर्कस्तान, सिरियाचा सावरण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 07:19 IST

सिरियात भूकंपानंतर तब्बल ४० तासांनी एका पडलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून पाचजणांच्या कुटुंबाला बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. 

अंकारा : तुर्कस्तान आणि सिरियात आलेल्या प्रलयंकारी भूकंपाने तेथील नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त केले. त्यातही काही नागरिक ढिगाऱ्याखाली जिवंत सापडत असल्याने हा एक चमत्कारच समजला जात आहे. सिरियात भूकंपानंतर तब्बल ४० तासांनी एका पडलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून पाचजणांच्या कुटुंबाला बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. 

इडलिब शहरात तब्बल ४० तासांनी या कुटुंबाला वाचविण्यात यश आले. बचावकर्त्यांनी प्रथम वडिलांना बाहेर काढले. त्यांना लगेच स्ट्रेचरवर रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर एका लहान मुलाला बाहेर काढण्यात आले. त्याला बाहेर काढताच तेथे जमलेल्या गर्दीने एकच जल्लोष केला.  त्यामुळे ते बालक गोंधळले. नंतर एका मुलीला बाहेर काढण्यात आले. नंतर  एक-एक करत पाच कुटुंबीयांना बाहेर काढण्यात आले. बचाव पथकातील फातिमा आबिद यांनी कुटुंबाची तब्येत चांगली असल्याची माहिती दिली. 

‘‘या कुटुंबाला वाचवता आल्याने आम्हाला अत्यानंद झाला. आम्हाला पुढे जाण्यासाठी आणि जास्तीत जास्त क्षमतेने काम करत राहण्यासाठी प्रेरणा आणि उत्साह मिळाला,’’ असे त्या म्हणाल्या. 

मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार सीरियात मारल्या गेलेल्यांना दफन करण्यासाठी सामूहिक कबरी बांधल्या जात आहेत. मृतांची संख्या प्रचंड असल्याने या कबरीतच सामूहिक दफन केले जात आहे. 

मदत पोहोचविण्यात अपयशभूकंपग्रस्त भागात मदत वेळेवर पोहोचत नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी ही बाब मान्य केली आहे. सरकारविरोधातील लोकांचा रोष पाहून एर्दोगन म्हणाले भूकंपानंतर सरकारच्या सुरुवातीच्या मदत मोहितमेत उणिवा होत्या.

ऑपरेशन दोस्त भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत सहावे विमान तुर्कस्तानला पाठवले आहे. बचावकार्यात एनडीआरएफने नुरदगी येथे एका इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सहा वर्षे वयाच्या बालिकेची सुटका केली. त्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

माझ्या आई, भावाला वाचवा हो... अंताक्या शहरात सेरप अर्सलान नावाची महिला कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याकडे साश्रुनयनांनी पाहत होती. या ढिगाऱ्यात तिची आई व भाऊ अडकलेले आहेत.  बुधवारपासून ढिगारे हटवण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे, असे सेरप यांनी सांगितले. “बरेच दिवसांपासून त्यांचा आवाज येत नाही. काहीही नाही”, असे सेलेन एकिमनने हातातील मोजांनी अश्रू पुसत सांगितले.

मुलीसह वडिलांना वाचवले-  अंताक्या शहरात आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी रात्रभर काम करून हेजल गनेर नावाच्या मुलीला आणि तिचे वडील सोनेर गुनेर यांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढले. पुन्हा भूकंपइंडोनेशियाच्या पूर्वेकडील पापुआ प्रांताला गुरुवारी भूकंपाचा धक्का बसला. यामुळे एक तरंगते उपाहारगृह समुद्रात बुडून चार जण ठार झाले. या भूकंपाचा केंद्रबिंदू अवघ्या २२ कि. मी. खोलीवर होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.१ एवढी नोंदली गेली. भूकंपामुळे घरे, इमारती व वैद्यकीय सुविधांचेही नुकसान झाले.

टॅग्स :EarthquakeभूकंपSyriaसीरियाDeathमृत्यू