शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

कोरोनाआडून इम्रान खानची 'विकेट' काढणार; पाकिस्तानमध्ये पुन्हा लष्करी राजवटीचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 15:01 IST

CoronaVirus पाकिस्तानमध्ये कम्युनिटी संक्रमनाला सुरुवात झाली असून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला कोरोनाचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे.

इस्लामाबाद : कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानवर येत्या काळात मोठे संकट कोसळणार आहे. एकीकडे रुग्णांची वाढती संख्या आणि आरोग्य यंत्रणेची दुर्दशा झालेली असताना आता पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार असणार आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाचे १२ हजारहून अधिक रुग्ण झाले आहेत. अशा संकटकाळात पाकिस्तानी लष्कराने खान यांना काहीसे बाजुला केले असून लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी ताबा घेतला आहे. 

पाकिस्तानमध्ये कम्युनिटी संक्रमनाला सुरुवात झाली असून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला कोरोनाचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे. डॉक्टर, नर्स आंदोलने करत आहेत. त्यांना पुरेशी वैद्यकीय उपकरणे, पीपीई किट मिळत नाहीत. यामुळे त्यांनी जर आम्हीच वाचलो नाही तर लोकांना कोण वाचवणार असा प्रश्न सरकारला विचारला आहे.

२२ मार्चला पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी देशात लॉकडाऊन करणार नसल्याचे सांगितले होते. यावेळी त्यांनी  लोक कोरोनापेक्षा उपाशी राहूनच मरतील अशी भीती व्यक्त केली होती. मात्र, त्यांच्या या घोषणेला २४ तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ता मेजर जनरल बाबर इफ्तिकार यांनी लॉकडाऊनवर सेना विचार करत असल्याचे म्हणत काही काळाने घोषणा केली. फायनान्शिअल टाईम्सने हे वृत्त दिले आहे. 

यानंतर पाकिस्तानभर लष्कराला तैनात करण्यात आले असून सरकारला यापासून लांब ठेवण्यात आले आहे. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी पाकिस्तानी लष्करच रणनीती बनवत आहे. लष्कराचे अधिकारी या कोरोनाच्या संकटाला एक संधी म्हणून पाहत आहेत. इम्रान खान देशाला सांभाळण्यासाठी सक्षम नाहीत आणि सेनाच लोकांना कोरोनापासून वाचवू शकते, असा डाव खेळला जात आहे. 

पाकिस्तानच्या एका निवृत्त जनरलने सांगितले की, इम्रान सरकारने कोरोना व्हायरसशी लढण्याच्या रणनीतीमध्ये मोठी चूक केली आहे आणि सैन्य त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडेही कोणता दुसरा पर्याय नाहीय. तर दुसरीकडे राजकीय तज्ज्ञांनी म्हटले की, यामागे लष्कराचा मोठा कट असून इम्रान खान यांना काश्मीर मुद्दा आणि कोरोनावरून अपयश आल्याचा ठपका ठेवत बाजुला केले जाऊ शकते. त्यातच इम्रान खान आणि ल्ष्करप्रमुख बाजवा यांच्यामध्ये खटके उडत असल्याचे वृत्त काही महिन्यांपूर्वी आले होते. तसेच एफटीएफच्या काळ्या यादीतून पाकिस्तानला बाहेर काढू न शकल्याचे खापरही खान यांच्यावर फोडण्यात येणार आहे. 

 

आणखी वाचा...

Video "चार बायका, २६ मुले, त्यांना खायला कुठून आणू?" पाकिस्तानीची व्यथा

किम जोंग उनचा मृत्यू की ब्रेन डेड? उद्या मोठ्या घोषणेची शक्यता

किम जोंग उन काहीच नाही, त्याच्यापेक्षाही क्रूर आहे बहीण क‍िम यो जोंग

...बस खिडकी थोडीशी उघडी ठेवा; कोरोनाला संपवण्यासाठी सरकारचे आवाहन

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरcorona virusकोरोना वायरस बातम्या