शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

Mike Tyson: प्रसिद्ध बॉक्सर माईक टायसनला राग अनावर, विमानात सहप्रवाशाला धु धु धुतलं; पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 10:43 IST

Mike Tyson: अमेरिकेचा प्रसिद्ध बॉक्सर माईक टायसनचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात तो विमानातील एका प्रवाशाच्या चेहऱ्यावर जोराने ठोसे मारताना दिसत आहे.

Mike Tyson Fight: अमेरिकेतील प्रसिद्ध बॉक्सर आणि अभिनेता माईक टायसन नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. आता परत एकदा तो चर्चेत आला आहे. चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, त्याला अनावर झालेला राग. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यात माईक टायसन विमानातील त्याच्या सहप्रवाशाला मारहाण करताना दिसत आहे. माईक टायसन त्या प्रवाशाच्या तोंडावर ठोसे मारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

55 वर्षीय माईक टायसन नेहमीच त्याच्या रागीट स्वभावासाठी ओळखला जातो. याआधीही तो अनेक प्रसंगी आपला संयम गमावताना दिसला आहे. यावेळी फ्लाइटमध्ये टायसन एका प्रवाशावर नाराज होऊन मारहाण करताना दिसत आहे. हे प्रकरण 20 एप्रिलचे आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

प्रवासी टायसनला त्रास देत होतामिळालेल्या माहितीनुसार, माईक टायसन सॅन फ्रान्सिस्कोहून फ्लोरिडाला जेटब्लू विमानाने जात होते. यावेळी, फ्लाइटमध्ये टायसनच्या मागे सीटवर एक व्यक्ती बसली होती, तो वारंवार टायसनला प्रश्न विचारत होता. अनेकदा नकार देऊनही त्या व्यक्तीने माईक टायसनशी बोलणे थांबवले नाही. यानंतर राग अनावर होऊन टायसन त्या व्यक्तीच्या तोंडावर जोराने ठोसे मारतो. विमानातील एक व्यक्ती त्याच्या मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार कैद करतो.

बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगवासटायसनने त्याचा अखेरचा अधिकृत सामना जून 2005 मध्ये खेळला होता. याससने 1996 पासून एकही विजेतेपद जिंकलेले नाही. दरम्यान, याआधीही अनेकवेळा टायसनचा राग अनावर झालेला पाहायला मिळाला आहे. 1997 मध्ये एका सामन्यादरम्यान टायसनने रागाच्या भरात एक विचित्र कृत्य केले होते. त्याने विरोधी बॉक्सर इव्हेंडर होलीफिल्डचा कान कापला होता. माईक टायसनवरही अंमली पदार्थांचे सेवन आणि बलात्काराचा गुन्हाही सिद्ध झाला आहे. यासाठी त्यांला तुरुंगातही जावे लागले आहे.

टॅग्स :boxingबॉक्सिंगAmericaअमेरिका