शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

"गाझामध्ये अशी कोणतीही जागा नाही जिथे इस्रायली सैन्य पोहोचलं नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 14:13 IST

Israel Palestine Conflict : 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्त्रायली पंतप्रधान म्हणाले होते की, आता हमाससाठी कोणतीही जागा सुरक्षित राहणार नाही.

इस्रायली सैन्याने बुधवारी पहाटे गाझामधील अल शिफा या सर्वात मोठ्या रुग्णालयावर कब्जा केला. या घटनेबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायलचा निषेध केला जात आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे की, "गाझामध्ये अशी कोणतीही जागा नाही जिथे इस्रायली सैन्य पोहोचलं नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही गाझा शहराच्या बाहेरील भागात पोहोचणार नाही आणि आम्ही पोहोचलो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही अल-शिफा रुग्णालयात प्रवेश करणार नाही आणि आम्ही तसं केलं."

7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्त्रायली पंतप्रधान म्हणाले होते की, आता हमाससाठी कोणतीही जागा सुरक्षित राहणार नाही. अल-शिफा हॉस्पिटलमध्ये इस्रायली लष्कराच्या कारवाईनंतर इस्रायलने हमासच्या विरोधात अचूक कारवाई करत असल्याचं सांगितलं. छाप्यादरम्यान रुग्णालयात 2,300 रुग्ण, कर्मचारी आणि विस्थापित पॅलेस्टिनी होते असा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे.

वृत्तसंस्था एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने हमासवर गाझा रुग्णालयांमध्ये दहशतवादी हल्ले करणे, ओलीस लपवणे आणि मानवी ढालीसारखे रुग्णांचे शोषण केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर हॉस्पिटलवरील हल्ल्यासाठी हमासने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना जबाबदार धरलं आहे. हमासने म्हटलं आहे की, व्हाईट हाऊस आणि पेंटागॉन खोटे दावा करत आहेत की हॉस्पिटल कॉम्प्लेक्सचा वापर लष्करी मोहिमेसाठी आणि हल्ल्यांसाठी केला जात आहे. 

आम्ही वैद्यकीय कर्मचारी, जखमी, आजारी लोकं, वेळेआधी जन्मलेली मुलं, विस्थापितांचं जीवन आणि सुरक्षिततेसाठी इस्रायलला जबाबदार धरलं आहे. हमास या दहशतवादी संघटनेने गाझातील सर्वात मोठे रुग्णालय अल-शिफा इस्रायली लष्कराच्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे. इस्रायली सैन्याने बुधवारी पहाटे अल-शिफा हॉस्पिटल कॉम्प्लेक्सता ताबा घेतला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध