शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गाझा युद्ध आता सीरियापर्यंत पोहोचले, इस्रायलकडून दमास्कस विमानतळावर बॉम्बचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 18:57 IST

इस्रायल-हमास युद्धादरम्यान सीरियावरील हा पहिला हल्ला असल्याचे सीरियाच्या सरकारी टीव्ही चॅनलने म्हटले आहे. 

पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली. यानंतर गाझा पट्टीत इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरूच आहे. गुरुवारी इस्त्रायलचे हल्ले आणखी भयावह झाले, जेव्हा त्यांच्या लढाऊ विमानांनी सीरियातील दोन मुख्य विमानतळांवर हवाई हल्ले केले. इस्रायल-हमास युद्धादरम्यान सीरियावरील हा पहिला हल्ला असल्याचे सीरियाच्या सरकारी टीव्ही चॅनलने म्हटले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने दमास्कस आणि अलेप्पो विमानतळावर हवाई हल्ले केले आहेत. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे अलेप्पो आणि राजधानी दमास्कसच्या विमानतळावर उड्डाणे थांबवावी लागली आहेत. दोन्हीवर युद्धग्रस्त सीरियन सरकारचे नियंत्रण आहे. दरम्यान, सहाव्या दिवशी हमास आणि इस्रायल यांच्यात जोरदार गोळीबार सुरू असतानाच हे हल्ले झाले. शनिवारी शेकडो हमास दहशतवाद्यांनी गाझा सीमा ओलांडून इस्रायलवर हल्ला केला आणि एक हजाराहून अधिक नागरिकांचा बळी घेतला. हे हल्ले अशावेळी झाले आहेत, जेव्हा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. 

दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी सीरियाचे समकक्ष बशर अल-असद यांच्याशी दूरध्वनी करून अरब आणि इस्लामिक देशांना इस्रायलचा सामना करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सीरियावरील वैयक्तिक हल्ल्यांवर इस्रायल क्वचितच भाष्य करते. मात्र तो आपला कट्टर शत्रू इराणला सीरियात कधीही पाय रोवू देणार नाही, असे इस्रायलने वारंवार सांगितले आहे.

इस्रायल आता समुद्रामार्गे हमासवर हल्ला करणारहमासशी सामना करण्यासाठी अमेरिकेने जगातील सर्वात मोठी, महागडी आणि हायटेक, शस्त्रास्त्रांनी सुसज्ज युद्धनौका इस्रायलला देण्याचा निर्णय घेतला आहे. 'USS गेराल्ड फोर्ड', असे या युद्धनौकेचे नाव आहे. ही युद्धनौका इस्रायलच्या दिशेने नेण्याचे आदेश अमेरिकन प्रशासनाने दिले आहेत. ही इतकी शक्तिशाली युद्धनौका आहे की, यात एकाच वेळी सुमारे पाच हजार सैनिक, 90 लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर वाहून नेता येऊ शकतात. ही युद्धनौका क्षेपणास्त्रांसह अनेक आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज आहे. 

जगातील सर्वात आधुनिक युद्धनौकाअमेरिकेने $ 18 अब्ज खर्च करून तयार केलेली ही आधुनिक युद्धनौका आहे. प्रत्येक बाबतीत ही जगातील कोणत्याही जहाजापेक्षा पुढे असल्याचा दावा केला जातो. ही नौका 337 मीटर लांब, 78 मीटर रुंद आणि 76 मीटर उंच आहे. ही 90 लढाऊ विमाने आणि अत्याधुनिक हेलिकॉप्टर वाहून नेऊ शकते. वजन आणि आकाराने प्रचंड असूनही ही समुद्रात खूप वेगाने फिरते. नौकेचा वेग 56 किलोमीटर प्रति तास इतका आहे, जो समुद्रातील जहाजासाठी एक उत्कृष्ट वेग आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष गेराल्ड आर फोर्ड यांच्या नावावरून या नौकेला हे नाव देण्यात आले आहे. फोर्ड यांनी नौदलाचीही सेवा केली होती, म्हणूनच हे अत्याधुनिक जहाज त्यांना समर्पित करण्यात आले.  

टॅग्स :Israelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध