शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मॅक्सिकोमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात आतापर्यंत 248 लोक मृत्युमुखी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 14:40 IST

मॅक्सिको देशाची राजधानी मॅक्सिको सिटी बुधवारी शक्तिशाली भूकंपानं हादरली. या भूकंपात आतापर्यंत 248 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. मॅक्सिकोमध्ये 1985 सालानंतर आलेला सर्वात विध्वंसकारी भूकंप आहे.

मॅक्सिको, दि. 20 - मॅक्सिको देशाची राजधानी मॅक्सिको सिटी बुधवारी शक्तिशाली भूकंपानं हादरली. या भूकंपात आतापर्यंत 248 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मॅक्सिकोमधील स्थानिक प्रशासनाच्या हवाल्यानं एपी या वृत्तसंस्थेनं दिली आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. मॅक्सिकोमध्ये 1985 सालानंतर आलेला सर्वात विध्वंसकारी भूकंप आहे.या भूकंपाच्या दुर्घटनेनंतर मॅक्सिकोमधील लोक रस्त्यावर उतरून सैरावैरा पळत आहेत.  अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली आहे. तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू पूएब्ला प्रांतामध्ये होता. मॅक्सिकोचे राष्ट्रपती पेना निएटो यांनीही भूकंपाच्या दुर्घटनेत मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं आहे. तसेच या भूकंपात जवळपास 27 इमारती कोसळल्याही माहितीही त्यांनी दिली आहे. मोरेलोस प्रांताच्या राज्यपालांनी भूकंपात आतापर्यंत 42 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तसेच मॅक्सिको महापौरांनीही भूकंपात 8 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.विध्वंसक भूकंपानं इमारती कोसळल्या असून, ढिगा-याखाली अनेक लोक दबल्याची भीतीही मॅक्सिकोच्या महापौरांनी व्यक्त केली आहे. भूकंपामुळे राजधानीतील एल सेंट्रो व रोमा जिल्ह्यांत जीवितहानीसह मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. कोसळलेल्या इमारतींच्या ढिगा-याखाली अनेक जण गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याप्रमाणेच ढिगा-यांखाली अडकलेल्या माणसांना बाहेर काढण्यासाठी बचावपथकही घटनास्थळी दाखल झालंय. परंतु बचावकार्य राबवताना त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. 

भूकंपानंतर मॅक्सिको सिटी विमानतळावरून विमानांचं उड्डाण रोखण्यात आलं आहे. दोन आठवड्यांपूर्वीच मॅक्सिकोच्या दक्षिणेकडच्या भागात झालेल्या भूकंपात 90 लोकांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे मॅक्सिकोमध्ये 1985मध्ये झालेल्या भूकंपाच्या 32 वर्षांनंतर त्याच दिवशी मॅक्सिको सिटी पुन्हा एकदा विध्वंसक भूकंपानं हादरली आहे. 1985साली मॅक्सिकोमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात 5 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.