शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मेस्सीचे पुतळे जाळण्याच्या पॅलेस्टीनच्या धमकीनंतर फिफाचा इस्रायलला हिसका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 11:56 IST

हा सामना होऊ घातलेले स्टेडियम 1948 साली इस्रायलच्या निर्मितीवेळच्या युद्धात उद्ध्वस्त झालेल्या पॅलेस्टिनी गावाच्या जागेवर तयार करण्यात आले आहे.

पॅलेस्टिनी संघटनांकडून होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील अर्जेंटिना व इस्रायल यांच्यातील सराव सामना रद्द करण्यात आला आहे. येत्या शनिवारी जेरुसलेम येथील टेडी कोलेक स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येणार होता. मात्र, पॅलेस्टिनी संघटनांनी या सामन्याला तीव्र विरोध केला होता. अर्जेंटिनाने हा सामना खेळू नये. त्यांनी हा सामना खेळल्यास अरब देशांनी अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनल मेस्सी याचे पुतळे जाळावेत, असे आवाहन पॅलेस्टिनी फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष जिब्रिल राजौब यांनी केले होते. याशिवाय, हा सामना होऊ घातलेले स्टेडियम 1948 साली इस्रायलच्या निर्मितीवेळच्या  युद्धात उद्ध्वस्त झालेल्या पॅलेस्टिनी गावाच्या जागेवर तयार करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पॅलेस्टिनी संघटनांकडून अर्जेंटिना आणि इस्रायल सामन्याला सातत्याने विरोध सुरू होता. या संघटनांनी फिफाकडेही आपली मागणी लावून धरली होती. यावेळी पॅलेस्टिनी खेळाडुंच्या प्रवासावर इस्रालयने घातलेल्या निर्बंधांकडेही या संघटनांनी लक्ष वेधत, इस्रायलला आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेतून बाहेर काढावे, अशी मागणी ते बऱ्याच काळापासून करत आहेत. हा सामना रद्द न केल्यास या संघटना आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी अर्जेंटिनाचा सराव सुरु असलेल्या बार्सिलोनातील क्रीडा संकुलाबाहेर निदर्शने करणार होत्या. मात्र, त्यापूर्वीच हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर अर्जेंटिनाचा खेळाडू गोंझालो ह्युग्वेने याने, अखेर योग्य निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Lionel Messiलिओनेल मेस्सीPalestineपॅलेस्टाइनIsraelइस्रायलFootballफुटबॉल