शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

लोकशाहीचा संदेश, पाकिस्तानवर प्रहार... मोदींच्या अमेरिका दौऱ्यातील १० प्रमुख गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 12:45 IST

Narendra Modi in US: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकन संसदेतील संसदेच्या संयुक्त अधिवेशनास संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील १० प्रमुख गोष्टी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकन संसदेतील संसदेच्या संयुक्त अधिवेशनास संबोधित केले. त्यांनी आर्थिक विकास, कोरोना लसीकरण आणि महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रात भारताने मिळवलेल्या यशाचा उल्लेख केला. तसेच भारत आणि अमेरिका हे समुद्रापासून अंतराळापर्यंत, व्यवसाय, कृषी, वित्त, कला आणि AI, आरोग्य या क्षेत्रात मिळून काम करत आहेत, असेही मोदींनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील १० प्रमुख गोष्टी.

 लोकशाही आमचा आत्माव्हाइट हाऊसमध्ये एका महिला पत्रकाराने मुस्लिम अल्पसंख्यांकांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी सांगितले की, केवळ लोक म्हणत नाहीत तर भारतात लोकशाही आहे. भारत आणि अमेरिका दोघांच्याही डीएनएमध्ये लोकशाही आहे. भारतात धर्म, जात यांच्या आधारावर भेदभाव केला जात नाही. मुस्लिमांना कुठल्याही शासकीय योजनेपासून वंचित ठेवले जात नाही. 

भारतात भेदभाव नाहीलोकशाहीमध्ये जात, पंथ, धर्म, लिंग अशा कुठल्याही गोष्टींवरून भेदभाव स्थान नसते‌. जेव्हा तुम्ही लोकशाहीबाबत बोलता तेव्हा जर मानवी मूल्य नसतील. मानवता नसेल तर ती लोकशाही असू शकत नाही. जेव्हा तुम्ही लोकशाहीचा स्वीकार करता तेव्हा  इतर बाबींना स्थान राहत नाही. त्यामुळे भारत सर्वांची साथ, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास या मुलभूत सिद्धांतासोबत चालतो

पाकिस्तानला इशाराभारत आणि अमेरिका दहशतवाद आणि कट्टरतावादाविरोधातील लढाईत एकत्र उभे आहेत. दहशतवादाविरोधात कारवाई आवश्यक आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया संपुष्टात आणण्यासाठी प्रभावी कारवाई होण्याची गरज आहे.

मोदींनी ऐकवली आपली कवितामोदींनी अमेरिकन काँग्रेसला संबोधित केले. यावेळी त्यांनी हा १४० कोटी भारतीयांचा सन्मान असल्याचे सांगितले. यावेळी मोदींनी स्वतः रचलेल्या एका कवितेचा उल्लेख केला. असमान मे सिर उठाकर घने बादलों को चिरकर, रोशनी का संकल्प लें, अभी तो सूर्य उगा है. दृढ निश्चय के साथ चलकर, हर मुश्कील को पार कर, घोर अंधेरे को मिटाने, अभी तो सूर्य उगा है. 

युक्रेन युद्धावर चर्चेने तोडगा आवश्यक जागतिकीकरणाचं एक मोठं नुकसान म्हणजे सप्लाय चेन मर्यादित झाली आहे. ही सप्लाय चेन लोकशाहीवादी असावी यासाठी आपण एकत्र मिळून प्रयत्न करणार आहोत. तंत्रच संरक्षण आणि आनंद निश्चित करेल. युक्रेन युद्धामुळे युरोपवर युद्धाचं संकट वाढलं आहे. यामध्ये अनेक शक्ती सहभागी आहेत. मी स्पष्टपणे सांगतो की, हा युद्धाचा काळ नाही आहे तर चर्चा आणि मुत्सद्देगिरीचा काळ आहे. लोकांना होत असलेल्या वेदना आपण मिळून थांबवल्या पाहिजेत. 

दहशतवादा मानवतेचा शत्रू इंडो-पॅसिफिक क्षेत्रातही तणावाचा परिणाम दिसत आहे. ९/११ चा हल्ला असो वा २६/११ चा हल्ला असो, यानंतर आपल्यासाठी दहशतवादा हा चिंतेचा विषय ठरलेला आहे. या हल्ल्याच्या एक दशकानंतरही कट्टरतावाद आणि दहशतवाद संपूर्ण जगासाठी एक गंभीर धोका बनलेला आहे. या विचारसरणी नवी ओळख आणि रूप घेत असतात. मात्र त्यांचे इरादे तेच आहेत. दहशतवाद मानवतेचा शत्रू आहे. तसेच त्याचा सामना करण्यामध्ये कुठलाही किंतु परंतु बाळगता कामा नये.  

भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेलभारतात २५०० पेक्षा अधिक राजकीय पक्ष आहेत. विविध राज्यांमध्ये सुमारे वेगवेगळे २० पक्ष सत्तेवर आहेत. आमच्या २२ अधिकृत भाषा आहेत. हजारो बोलीभाषा आहेत. मात्र तरीही आम्ही एका सूरातच बोलतो.  आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच आम्ही तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू.  

भारतात स्वस्तात झाली इंटरनेट क्रांती गेल्या ९ वर्षांमध्ये एक अब्ज लोकांना तंत्राशी जोडण्याच आलं आहे. १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात येत आहेत. ८५ कोटी लोकांना डीबीटीमधून थेट पैसे मिळत आहेत. भारतामध्ये स्वस्तातील इंटरनेट ही मोठी क्रांती आहे. तंत्रज्ञानामुळे समाज परस्परांशी जोडला गेला आहे. इंटरनेटचा फायदा प्रत्येक भारतीयाला मिळत आहे. 

भारतामध्ये सर्वाधिक महिला पायलट आम्ही राष्ट्रीय आरोग्य विमा योजना चालवत आहोत. भारतामध्ये ५० कोटी लोकांसाठी मोफत आरोग्य योजना राबवली जात आहे. जनधन योजनेतून ५० कोटी लोकांना फायदा झाला आहे. भारतामध्ये २०० कोटी कोरोनावरील लसी तयार झाल्या. आजच्या भारतात महिलांची स्थिती सुधारली आहे. देशाच्या सैन्यदलांमध्येही महिलांची भागीदारी वाढली आहे. सर्वाधिक महिला पायलट हे भारतात आहेत. भारतात १५ महिला निवडलेल्या प्रतिनिधी आहेत. 

महात्मा गांधी आणि मार्टिन ल्युथर यांच्या विचारांचा प्रभाव भारत आणि अमेरिका हे दोन्ही महान लोकशाहीवादी देश आहेत. लोकशाहीमुळे दोन्ही देशांमध्ये दृढ संबंध आहेत. अमेरिकेच्या स्वप्नांमध्ये भारतीयांचंही योगदान आहे. भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर महात्मा गांधी आणि मार्टिन ल्युथर यांचा प्रबाव आहे. अनेक वर्षे दोन्ही देशांनी एकमेकांना प्रभावित केले आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतUnited StatesअमेरिकाJoe Bidenज्यो बायडनPakistanपाकिस्तान