शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मासिक पाळीची तुलना शहिदांच्या रक्ताशी, सौंदर्यवतीला गमावावा लागला किताब

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 06:23 IST

सोशल मीडियावर बेजबाबदार वक्तव्य करणं तुम्हाला महागात पडू शकतं. याचाच प्रत्यय तुर्कीतील एका महिला मॉडेलला आला आहे. काही दिवसांपूर्वी 18 वर्षीय मॉडेलने आपल्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले होते.

अंकारा, दि. 25 - सोशल मीडियावर बेजबाबदार वक्तव्य करणं तुम्हाला महागात पडू शकतं. याचाच प्रत्यय तुर्कीतील एका महिला मॉडेलला आला आहे. काही दिवसांपूर्वी 18 वर्षीय मॉडेलने आपल्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले होते.  त्यात तिने मासिक पाळीतील रक्ताची तुलना शहिदांच्या रक्ताशी केली होती. या कारणामुळे तिच्याकडून ह्यमिस तुर्कीह्णचा किताब काढून घेण्यात आला आहे.

इतिर एसेन असे त्या 18 वर्षीय महिला मॉडेलचं नाव आहे. तीनं मिस तुर्की या स्पर्धेत भाग घेऊन किताब पटकावला होता. परंतु काही वेळातच तिच्याकडून हा किताब काढून घेण्यात आला. तिने केलेले हे वादग्रस्त ट्विट आयोजकांसमोर आले. मिस तुर्की जगात देशाचे प्रतिनिधत्व करण्याचे काम करते त्यामुळे तिचे हे वक्तव्य योग्य नसल्याचे सांगत आयोजकांनी तिच्याकडून हा किताब काढून घेतला. इतिराऐवजी फर्स्ट रनरअप ठरलेली अस्ली सुमेन चीनमध्ये होणाऱ्या मिस वर्ल्ड स्पर्धेत तुर्कस्थानाचं प्रतिनिधीत्व करणार आहे.

15 जुलैला तुर्कस्तानातील सत्तांतराच्या प्रयत्नाचा पहिला वर्धापन दिवस होता. वर्षभरापूर्वी झालेल्या सत्तांतराच्या प्रयत्नात सैनिकांशी लढताना सुमारे 250 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्याच वर्धापनदिनानिमित्त इतिराने हे ट्विट केले असून त्यात शहीद झालेल्यांच्या रक्ताची तुलना मासिक पाळीतील रक्ताशी केली होती. यावरुन तुर्की तसेच जगभरातून तिच्यावर संताप व्यक्त करण्यात येत होता. याचीच परिचीती म्हणून तिचा मिस तुर्की हा किताब काढून घेण्यात आला आहे. हे वादग्रस्त ट्विट व्हायरल झाल्यानंतर आयोजकांना हा निर्णय घ्यावा लागला. मिस तुर्की संघटनेकडून अशा प्रकारच्या ट्वीट्सना प्रोत्साहन देण्याची शक्यताच नाही. जगात देशाची प्रतिमा उंचावण्याचं काम मिस तुर्की करते. असं सांगत आयोजकांनी इतिरचा किताब परत घेतला. इतिर एसेनला ह्या ट्विटनं चांगलीच अद्दल घडवून गेली असेच म्हणावं लागेल.

काय होतं ट्वीट?15 जुलै. शहीद दिनाच्या सकाळी मला पिरीएड्स आले आहेत. मी प्रतिकात्मकरित्या आपल्या शहिदांचं रक्त वाहून हा दिवस साजरा करत आहेह्ण असं इतिरने लिहिलं होतं. आपण राजकारणातील तज्ज्ञ नाही, आपण राजकारणही करत नव्हतो, असं तिने इन्स्टाग्रामवर लिहिलं.