शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मेलोनी आणि चापो यांची 'हाइट ऑफ डिप्लोमसी! एका व्हायरल भेटीची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 09:24 IST

सुमारे पाच फूट उंचीच्या जॉर्जिया मेलोनी आणि सुमारे सहा फूट आठ इंच उंचीचे चापो यांच्या भेटीत जॉर्जिया मेलोनी या विस्फारलेल्या डोळ्यांनी चापो यांच्याकडे पाहतानाचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले.

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि मोझाम्बिकचे राष्ट्रपती डॅनियल फ्रान्सिस्को चापो यांच्या एका भेटीची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. इटलीतील पंतप्रधान कार्यालय ज्या पालाझो किजी इथे आहे तिथे ही भेट झाली. सुमारे पाच फूट उंचीच्या जॉर्जिया मेलोनी आणि सुमारे सहा फूट आठ इंच उंचीचे चापो यांच्या भेटीत जॉर्जिया मेलोनी या विस्फारलेल्या डोळ्यांनी चापो यांच्याकडे पाहतानाचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले. दोघांच्या उंचीतील फरकामुळे या फोटोवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. मेलोनी आणि चापो यांच्या उंचीमध्ये असलेल्या फरकामुळे त्या दोघांनाही एका फोटोफ्रेममध्ये बसवताना छायाचित्रकारांचीही तारांबळ उडाली. या भेटीला सोशल मीडियामध्ये 'हाइट ऑफ डिप्लोमसी' असेही संबोधण्यात येत आहे.

जॉर्जिया मेलोनी यांनी चापो यांच्या स्वागतासाठी पुढे होताच त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यापूर्वी आधी विस्फारलेल्या डोळ्यांनी मान वर करून त्यांच्याकडे पाहिले. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि मेलोनी यांच्या या दोन्ही मुद्रा कॅमेरामध्ये कैद झाल्या. त्यामुळे मेलोनी आणि चापो यांच्या भेटीचे हे फोटो व्हायरल झाले, यात काही नवल नाही.

डॅनियल फ्रान्सिस चापो यांनी २०२५ च्या सुरुवातीला मोझाम्बिकच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या उंचीमुळे ते कुठेही जातात आणि कुणालाही भेटतात, तेव्हा त्या भेटीची चर्चा होतेच. इटलीच्या अधिकृत दौऱ्यावर आल्यानंतर ते मेलोनी यांना भेटले, तेव्हाही त्याचीच पुनरावृत्ती झाली. या भेटीत इटली आणि मोझाम्बिक या दोन देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करणे, ऊर्जा, व्यापार, आर्थिक आणि राजनैतिक संबंध अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

जॉर्जिया मेलोनी या इटली आणि युरोपमधील एक अत्यंत प्रसिद्ध राजकीय नेत्या म्हणून ओळखल्या जातात. ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांनी इटलीच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. त्यांच्या ठाम राजकीय भूमिकांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या सातत्याने चर्चेत असतात. स्थलांतरितांबाबतचे धोरण, राष्ट्रीय हितसंबंध आणि युरोपियन राजकारणात त्या वेळोवेळी घेत असलेल्याभूमिका यामुळेही त्यांचे नाव अनेकदा आंतरराष्ट्रीय वृत्तमाध्यमांमध्ये झळकत असते.

भारतातही मेलोनी यांच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. त्या सोशल मीडियावर सक्रीय असतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त मेलोनी यांनी त्यांना शुभेच्छा देणारा फोटो पोस्ट केला होता. त्यात पंतप्रधान मोदी यांना 'सोर्स ऑफ इन्स्पिरेशन' म्हणून संबोधले होते. मेलोनी आणि पंतप्रधान मोदी यांच्या मैत्रीची चर्चा 'मीम्स'मधूनही सतत होत असते. त्यातूनच 'मेलोडी' हा हॅशटॅगही लोकप्रिय झालेला दिसतो.

मेलोनी यांचे व्यक्तीमत्व प्रसन्न आहे. त्यांच्या मनात काय चालले आहे हे अगदी सहज त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. त्यामुळेच मोझाम्बिकचे राष्ट्रपती चापो यांच्या स्वागत प्रसंगी त्यांच्या उंचीमुळे मेलोनी यांच्या चेहऱ्यावर उमटलेले विस्मयाचे भावही त्यांना लपवता आले नाहीत आणि त्या भेटीचे फोटो, व्हिडीओ सहज व्हायरल झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Meloni and Chapo's height difference sparks 'Diplomacy' buzz online.

Web Summary : Italian PM Meloni's reaction to Mozambique President Chapo's height went viral. Their meeting focused on strengthening bilateral ties, energy, trade, and diplomatic relations. Meloni, a prominent figure, is known for her policies and enjoys a large following, including in India.
टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीInternationalआंतरराष्ट्रीयItalyइटली