शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

बिल गेट्ससोबत घटस्फोट आणि त्यांच्या अफेअरबाबत पहिल्यांदाच बोलल्या मेलिंडा; म्हणाल्या - खूप रडले होते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 13:55 IST

Melinda Gates : मेलिंडा या बिल गेट्सच्या अफेअर बाबत बोलल्या आणि त्या म्हणाल्या की, बिल यांना यासाठी माफही केलं होतं. पण तरीही एका वेळेनंतर दोघांच्या नात्यात काही राहिलं नव्हतं. 

मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडडर आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बिल गेट्स (Bill Gates) यांनी लग्नाच्या २७ वर्षांनंतर पत्नी मेलिंडा (Melinda Gates) यांना २०२१ मध्ये घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. आता मेलिंडा यांनी पहिल्यांदाच बिल गेट्ससोबत घटस्फोटाच्या कारणांवर भाष्य केलं. मेलिंडा या बिल गेट्सच्या अफेअर बाबत बोलल्या आणि त्या म्हणाल्या की, बिल यांना यासाठी माफही केलं होतं. पण तरीही एका वेळेनंतर दोघांच्या नात्यात काही राहिलं नव्हतं. 

मेलिंडा गेट्सने सीबीएस न्यूज मॉर्निंग शोमध्ये 'सीबीएस मॉर्निंग' मध्ये गेल किंगला मुलाखत दिली. ज्यात त्या बिल गेट्स यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबाबत म्हणाल्या की, 'मी निश्चितपणे माफ करण्यावर विश्वास ठेवते. त्यामुळे मला वाटलं होतं की, आम्ही पुन्हा आमचं नातं सुरळीत करू शकतो'.

मेलिंडा यांच्या घटस्फोटाच्या घोषणेनंतर बिल यांच्या प्रवक्त्याने बिल गेट्स यांच्या २० वर्ष जुन्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची माहिती दिली होती. मेलिंडासोबत लग्न केल्यावरही बिल यांचं हे अफेअर सुरू होतं.

मेलिंडा पुढे म्हणाल्या की, 'ते काही एकटं कारण नव्हतं किंवा एक अशी गोष्ट नव्हती जी आमच्यात झाली. एक वेळ अशीही आली जेव्हा आमच्या दोघात काहीच शिल्लक राहिलं नाही आणि मला वाटलं हे ठीक नाही. आमच्यात जे काही झालं त्यानंतर मी विश्वास ठेवू शकत नव्हती'.

मेलिंडा म्हणाल्या की, जेव्हा त्या बिलपासून वेगळ्या झाल्या तेव्हा अनेक दिवस त्या रडल्या. त्यांच्या आयुष्यात अनेक असे क्षण आले जेव्हा त्यांना आपलं लग्न तुटण्यावर राग आला होता. त्या म्हणाल्या की, 'तो माझ्यासाटी शॉकचा काळ होता'.

त्या म्हणाल्या की, आता त्या या दु:खातून बाहेर पडत आहेत आणि आयुष्यात पुढे जात आहे. आता त्या जीवनाच्या दुसऱ्या बाजूला बघण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच आता ठीक होत आहेत. त्या म्हणाल्या की, 'मला असं वाटत आहे की, मी माझ्या आयुष्याच्या नव्या चॅप्टर पान पलटत आहे. म्हणजे आपण आता २०२२ सालात आलो आहोत. मी फार उत्साही आहे की, जीवनात पुढे काय होणार आहे'.

मे २०२१ मध्ये बिल आणि मेलिंडा यांनी आपल्या घटस्फोटाची घोषणा करताना सांगितलं होतं की, बराच विचार केल्यावर आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच दोघे असंही म्हणाले होते की, आपल्या चॅरिटेबल फाउंडेशनमध्ये सोबत मिळून काम करतील. 

टॅग्स :Bill Gatesबिल गेटसDivorceघटस्फोटInternationalआंतरराष्ट्रीय