शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चुकून बँक खात्यात ट्रान्सफर झाले 57 कोटी; आता पैसे खर्च केल्यानंतर व्याजासह परत करावे लागणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 09:32 IST

Melbourne : ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, 10.4 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्स एका महिलेच्या खात्यात चुकून जमा झाले होते. म्हणजेच भारतीय रुपयात हिशोब केला तर ते 57 कोटींच्या आसपास आहे.

मेलबर्न :  अनेकदा चुकून लोकांच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा होते. सहसा अशा परिस्थितीत लोकांना जमा झालेले पैसे बँकेत परत करावे लागतात. भारतात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता असेच एक प्रकरण ऑस्ट्रेलियातून समोर आले आहे. पण, याठिकाणी घडलेले प्रकरण जरा गुंतागुंतीचे आहे. कारण, ज्यांच्या खात्यात चुकून पैसे जमा झाले. ते त्यांनी लगेच खर्च केले. यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्याने संबंधिताला व्याजासह पैसे परत करावे लागणार आहेत.

ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, 10.4 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्स एका महिलेच्या खात्यात चुकून जमा झाले होते. म्हणजेच भारतीय रुपयात हिशोब केला तर ते 57 कोटींच्या आसपास आहे. आता हे सर्व पैसे परत करण्याचे आदेश न्यायालयाने महिलेला दिले आहेत. तसेच, या महिलेला 10 टक्के व्याजासह कायदेशीर खर्चही भरावा लागेल, असेही सांगण्यात आले आहे.

रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी मे महिन्यात मेलबर्नचे रहिवासी थेवामनोग्री मॅनिवेल यांना क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज crypto.com कडून 100 डॉलर रिफंड मिळणार होता. पण, सिंगापूरस्थित ट्रेडिंग प्लॅटफॉर्मने मोठी चूक केली. न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, त्यांनी चुकून 10,474,143 डॉलर दुसर्‍या क्लायंट मॅनिवेल यांना ट्रान्सफर केले. त्यानंतर मॅनिवेल यांनी आपली मुलगी आणि बहीण अशा कुटुंबातील सदस्यांसह इतर सहा जणांना पैसे भेट म्हणून दिले.

आता घर विकावे लागेलऑडिटमध्ये ही चूक उघड झाल्यानंतर crypto.com ने कायदेशीर कारवाई सुरू केली. गेल्या शुक्रवारी न्यायालयाने Crypto.com च्या बाजूने निर्णय दिला आणि सर्व पैसे आणि अतिरिक्त खर्च देण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार, मॅनिवेल यांच्या बहिणीला मेलबर्नमधील 1.35 मिलियन डॉलरचे घर विकावे लागेल. जे पूर्णपणे चुकीच्या पेमेंटद्वारे देण्यात आल्याचा आरोप आहे.

टॅग्स :bankबँकAustraliaआॅस्ट्रेलिया