शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीने व्यक्त केली भारतात येण्याची इच्छा, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 14:30 IST

Mehul Choksi PNB scam: भारतात सुरक्षा मिळेल की नाही, याबाबत मला संशय आहे.

ठळक मुद्देमेहुल चोकसीने भारतीय एजंसीजवर अपहरणाचा आरोप लावला आहे.

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील (PNB Scam) फरार आरोपी मेहुल चोकसीने भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण, भारतात आपल्या सुरक्षेबाबत तो घाबरलाय. मला भारतात यायचं आहे, पण डोमिनिका कोर्टाने मला सध्या एंटीगामध्ये राहण्यास सांगितले आहे, अशी माहिती त्याने दिली.दरम्यान, डोमिनाका कोर्टाने उपचार घेण्यासाठी मेहुलला जामीन मंजुर केला आहे. तसेच, त्याला उपचार घेण्यासाठी एंटीगाला जाण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.

मीडियाशी संवाद साधताना मेहुल चोकसी म्हणाला की, 'मी निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी भारतात येण्याचा विचार करत होतो. पण, डोमिनिका कोर्टानं मला एंटीगामध्येच राहण्यास सांगितलं आहे. मी आता बाहेर जाऊ शकत नाही. माझ्या अपहरणातील ते 50 दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात काळे दिवस होते. भारतात येण्याचा मी विचार करत होतो. पण तिथे सुरक्षा मिळेल की नाही, याबाबत मला संशय आहे.

अपहरण केल्याचा चोकसीचा दावा25 मे रोजी मेहूल एंटीगामधून अचानक बेपत्ता झाला होता. काही दिवसानंत त्याला डोमिनिकामध्ये अधिकाऱ्यांनी अवैधरित्या घुसल्याच्या आरोपाखाली अटक केली. परंतु, मेहुलने अपहरण करुन त्याला डोमिनिकामध्ये आणल्याचा दावा केला होता. तसेच, अपहरणकर्त्यानं मारहाण केल्याचा आरोपही त्याने केला होता. नुकतंच त्याने एक ऑडिओ क्लिप जारी करुन भारतीय एजंसीजवर अपहरणाचा आरोप लावला आहे.

पीएनबी घोटाळ्यातील आरोपीफरार मेहुल चोकसीवर पंजाब नॅशनल बँकेत 13,500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याची माहिती उघड झाल्यानंतर तो एंटीगामध्ये पळून गेला होता. अनेक दिवस तो तिथेच राहिला. पण, मे महिन्यात तो डोमिनिकामध्ये गेला. पोलिसांनी तिथे त्याला अटक केली. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयbankबँकNirav Modiनीरव मोदी