शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

७.१ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे विध्वंस; ५३ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:27 IST

तिबेटमधील भूकंपात आतापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.

Earthquake In Tibet:नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या तिबेटमधील शिजांग या डोंगराळ भागात मंगळवारी भूकंपाचा धक्का बसला आहे. ७.१ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. या भूकंपाच्या धक्क्याने आतापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाला असून ६४ जण जखमी झाले आहेत. बचाव पथकाडून मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. भारताच्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

लोक गाढ झोपेत असतानाच भारत, नेपाळ आणि चीन ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हादरले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ-तिबेट सीमेजवळ होता. या शक्तिशाली भूकंपामुळे ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी पहाटे ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यानंतर त्याचा प्रभाव चीन आणि भारतातील अनेक शहरांमध्येही दिसून आला. तिबेटमधील भूकंपामुळे दिल्ली, बिहार, बंगालसह अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

चीनच्या भूकंप निरीक्षण संस्थेने भूकंपाची तीव्रता ६.८ इतकी नोंदवली. भूकंपामुळे तिबेटमध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे. सकाळी ९:०५ वाजता शिआन स्वायत्त प्रदेशातील शिगाझे शहरातील डिंगरी काउंटीला भूकंपाचा धक्का बसल्याने ५३ लोकांचा मृत्यू झाला आणि ६४ हून अधिक जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तिबेटमध्ये सकाळच्या सुमारास झालेल्या या भूकंपामुचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भूकंपानंतर काही सेकंदात किती इमारती मोडकळीस आल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. भूकंपाच्या जोरदार धक्क्याने घाबरलेले लोक घराबाहेर पळताना दिसत आहेत.

नेपाळ, भूतान आणि भारताच्या काही भागांसह शेजारील देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा प्रभाव लक्षणीय होता ज्यामुळे अनेक ठिकाणी इमारती हादरल्या. तिबेटमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या केंद्राजवळील भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिली. त्यापैकी काही भूकंपाच्या केंद्रापासून फक्त ५ किलोमीटर अंतरावर होते. 

तिबेट शेजारील नेपाळमध्ये सक्रिय भूकंपीय क्षेत्र आहे. ज्यामुळे वारंवार आणि कधीकधी आपत्तीजनक भूकंप होत असतात. याआधी २०१५ मधील ७.८ रिश्टर स्केलच्या मोठ्या भूकंपाने नेपाळला उद्ध्वस्त केले होते. त्यात जवळपास ९,००० लोक मारले गेले आणि २२,००० हून अधिक लोक जखमी झाले होते.

टॅग्स :EarthquakeभूकंपNepalनेपाळIndiaभारत