शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मसूद अझहर आजारी, घरातून बाहेर पडू शकत नाही, पाकिस्तानची कबुली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 11:15 IST

पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानची चौफेर कोंडी झाली आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानची चौफेर कोंडी झाली आहे. एकीकडे पाकिस्तान शांततेच्या बाता मारत असताना दुसरीकडे मसूद अझहरबाबतचा त्यांचा दुटप्पीपणा उघड झाला. आहे. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतावादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तान पुरावे  मागत आहे. तर दुसरीकडे मसूद अझहर हा पाकिस्तानातच असून, तो आजारी असल्याने घरातून बाहेरही पडू शकत नाही, असा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कबूल केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांनी मसूद अझहर हा पाकिस्तानातच असल्याचे मान्य केले. ते म्हणाले की, ''माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार मसूद अझहर हा पाकिस्तानमध्ये  आहे. तसेच सध्या तो खूप आजारी आहे. त्याचा आजार गंभीर असल्याने तो घराबाहेरही पडू शकत नाही.'' भारताने केलेल्या आरोपानंतर पाकिस्तान मसूद अझहर याला अटक करणार का? असे विचारले असता कुरैशी यांनी सांगितले की,"भारताकडे यासंदर्भातील पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत. जेणेकरून पाकिस्तानी जनता आणि न्यायालयाच्या शंकांचे निरसन करता येईल.'' दरम्यान, पुलामावा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला एक डॉजियर सोपववे आहेत.  त्यात पुलवामा येथील हल्ल्यामागे जैश ए मोहम्मदचा हात असल्याचे सबळ पुरावे देण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही पाकिस्तानचा खोटारडेपणा सुरू आहे. पुलावामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. जैश ए मोहम्मदच्या धोरणांनुसार हल्लेखोर आदिल डार याने एक व्हिडिओसुद्धा प्रसिद्ध केला होता. ज्यात त्याने आपण जैश ए मोहम्मदचा दहशतवादी असल्याचे मान्य केले होते.  

टॅग्स :masood azharमसूद अजहरPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी